गोल्डन आय न्यूज नेटवर्क
*वर्षातुन एकदा सेवाभावी आश्रमात अन्नदान करुन वृध्दाश्रमास सहकार्य करावे* !
अजय पावटेकर यांचे आवाहन.
येवला –(जि.नाशिक ); समाजातुन आपल्याकडील वाढदिवस,वर्षश्राध्द ,पुण्यस्मरण आदी निमित्ताने सेवाभावी आश्रमात अन्नदान करावे.असे सामाजिक कार्यकर्ते अजय पावटेकर यांनी येवला तालुक्यातील लौकी शिरसगाव येथे सैंगऋषी वृध्दाश्रम येथील आयोजित अन्नदान प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना आवाहनपर व्यक्त केले.
कै.ग.भा.सुभद्राबाई वासुदेव पावटेकर यांच्या प्रथम वर्षश्राध्द निमित्ताने आदिगुरु दत्तात्रय प्रभुकृपा फाउंडेशन मु.पो.लौकी शिरसगाव ,ता.येवला ,जि.नाशिक संचलित सैंगऋषी वृध्दाश्रम,लौकी शिरसगाव येथे अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते.आपल्या आईच्या स्मरणार्थ अन्नदान आयोजन कार्यक्रम प्रसंगी अजय उर्फ घनश्याम पावटेकर हे सामाजिक भावनेतुन आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, या वृध्दाश्रमासाठी संस्थापक नवनाथ ज-हाड व त्यांच्या पत्नी स्वतःमोलमजुरी कष्ट करुन शेतमजुरी करुन हा आश्रम सामाजिकदृष्ट्या चालवितात.
याठिकाणी २५ ते ३० वयोवृध्दांची संख्या आहे.त्यांच्या उदरनिर्वाहाचा खर्च ते कष्ट करुन करतात.व वृध्दाश्रमास सहकार्य करतात .असा हा सामाजिक प्रश्न सोडवित असतांना या आश्रमास शासन स्तरावरचे कुठलेही अनुदान/मदत नसल्याचे समजते.
तरी अशा या आश्रमात आपल्याकडील मुलांचा,आपला वाढदिवस,लग्न वाढदिवस तसेच आई वडिलांच्या पुण्यस्मरण निमित्ताने या गोर- गरिबांना वर्षातुन एक दिवसअन्नदान द्यावे.व सर्वांनी या वृध्दाश्रमास सहकार्य करावे.असे आवाहन त्यांनी केले.
तसेच वृध्दाश्रम येथे अन्नदान नियोजन व आधिक माहितीसाठी सामाजिक कार्यकर्ते अजय पावटेकर ,येवला जि.नाशिक व पत्रकार आत्माराम ढेकळे ,आंबेगाव,पुणे यांचेसी संबधितांनी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष संपर्क साधल्यास संबधित सेवाभावी आश्रमासी संपर्क कार्य करता येईल.
जाहिरात