गोल्डन आय न्यूज नेटवर्क
संगणक तज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांच्या ५३व्या पुस्तकाचे पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते प्रकाशन .!
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स)या अतिशय महत्वाच्या विषयावर डॉ. दीपक शिकारपूर यांनी ५३वे पुस्तक लिहिले आहे. दिलीपराज प्रकाशनाने ते प्रकाशित केले आहे. मल्टीव्हर्सिटी या अतिशय पवित्र वास्तूत पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण, जेष्ठ संगणक तज्ञ डॉ. विजय भटकर याच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. जागतिक संगणक साक्षरता दिन दरवर्षी २ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो . ह्याचे निमित्त साधून डॉ दीपक शिकारपूर ह्यांनी हे पुस्तक लिहिले आहे .
२०२४ आता अगदी जवळ येऊन ठेपले आहे . आजचं युग पूर्णपणे डिजिटल झालंय .माहिती (डेटा), कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी या तीन घटकांचा समावेश असलेली चौथी औद्योगिक क्रांती आता जगात घडू लागली आहे;
यंत्रमानव व मानव ह्यामधील दरी आगामी शतकात कमी कमी होणार आहे ‘ऑटोमेशन’ आणि ‘कृत्तीम बुद्धिमत्ता आज सगळ्यात वेगाने वाढणारी क्षेत्र होत चालली आहे. असे मत जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण , महाराष्ट्र भूषण प्राप्त डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.
कृत्तीम बुद्धिमत्ता क्षेत्रातील ही झेप अनेक क्षेत्रांवर आपला प्रभाव दाखवायला नजीकच्या काळात सुरुवात करेल. अनेक क्षेत्रे या तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र बदलतील . येत्या दहा पंधरा वर्षांच्या काळात रोबो (यंत्रमानव) हा सर्वसामान्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटक बनेल अर्थात हे भविष्य ध्यानात घेऊन शिक्षणक्रम, ते शिकवणार्या संस्था आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती ह्यांमध्ये कालानुरूप बदल व्हायला हवे.
हे बदल समजून घेणे व आत्मसात करणे हे एक कठीण काम एकविसाव्या शतकात जन्मलेल्या पिढीला करावे लागणार आहे. असे विचार डॉ. शिकारपूर यांनी यावेळी व्यक्त केले.
जाहिरात