गोल्डन आय न्यूज नेटवर्क
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे गुरुवारी ‘विठू माऊली माझी’ अभंगवाणी कार्यक्रम !
कार्तिकी एकादशीनिमित्त भक्तीगीते ऐकण्याची संधी !
पुणे : कार्तिकी एकादशीनिमित्त शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे रत्नमोहन प्रस्तुत ‘विठू माऊली माझी’ या अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम गुरुवार, दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी दिली. कार्यक्रमाचे यंदाचे 24वे वर्ष आहे.
प्रसिद्ध गायक संजीव मेहेंदळे, सावनी सावरकर व सचिन इंगळे भक्तीगीते सादर करणार आहेत. त्यांना निलेश देशपांडे, अमृता ठाकूरदेसाई, राजेंद्र दूरकर, केदार मोरे, सोमनाथ साळुंके साथसंगत करणार असून कार्यक्रमाचे निरूपण रवींद्र खरे करणार आहेत. संगीत संयोजन सचिन इंगळे यांचे आहे. कार्यक्रमाची निर्मिती लक्ष्मीकांत खाबिया आणि राहुल देशपांडे यांची आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात