गोल्डन आय न्यूज नेटवर्क
*सयाजीनगरी बडोदे येथे समस्त अहिर सुवर्णकार समाज वडोदरा कडून नरहरी पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात संपन्न.!!
बडोदा:-(प्रतिनिधी) येथील समस्त अहिर सुवर्णकार समाजाच्या वतीने संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी 16 मार्च रोजी, तरसाली येथे भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. समाजाचे आधारस्तंभ, बडोदा समाज स्थापनेपासून आजतागायत एकनिष्ठ राहून समाजासाठी समर्पित झालेल्या निस्वार्थ मान्यवरांना स्वामी अनंतरानंदजी महाराज यांच्या शुभहस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
सभेचे अध्यक्ष श्री सुनीलशेठ गनदेवीकर होते प्रमुख अतिथी स्वामी अनंतरानंदजी, श्री गिरीश लक्ष्मणशेठ, वडोदराचे मा. मेयर निलेश राठोड, सुरत येथील ज्वेलर्स श्री धर्मेश यशवंतशेठ भामरे व भालचन्द्र भामरे उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत ज्येष्ठ समाजसेवक श्री अरुणशेठ पिंगळे, श्री गंगाधरशेठ जगताप व गणदेवीकर बंधूंना समाजरत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
श्री विलासशेठ भामरे, श्री सुधाकरशेठ वानखेडे, श्री सुधाकरशेठ भामरे यांना समाजभूषण तसेच प्रकाशशेठ मैंद, चंद्रकांतशेठ मोरे, अरुणशेठ विसपुते, के एम सोनी, श्री दीपक लोणेरकर इ 19 ज्येष्ठ समाज श्रेष्ठींना समाज गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
आद्य संस्थापक भगवान शंकरशेठ भामरे, बी बी वानखेड़े,शांतारामशेठ दुसाने, केशवशेठ दुसाने, शिरपुरकर इ. ना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला. प्रथम समूह लग्न सोहळ्यात मोलाचे योगदान केलेले श्री विवेक गणदेवीकर,श्री कमलेश थोरात,श्री मनोहर पिंगळे,श्री योगेश जगताप व युवा टीम यांचेही विशेष सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमास योगायोगाने पुण्याहून श्री विकास विसपुते संस्थापक, वंशावळी डॉट कॉम सह-संस्थापक, सकल भारतीय सोनार समाज संघटन हे देखील उपस्थित राहिले त्याने दुग्ध शर्करा योग आला.
सुरवातीला समाज बंधू श्री दीपक मोरे यांनी जादूचा खेळ करून सर्वांचे मनोरंजन केले.बालिका नृत्य, गायनाने कार्यक्रमास रंगत आणली.
समस्त अहिर सुवर्णकार समाज, वडोदरा कार्यकारी मंडळ, ट्रस्टी मंडळ व महिला मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
सर्व विभागीय कार्यकर्ते मिळून कार्यक्रम सुरेख झाला.
जय नरहरी🙏