गोल्डन आय न्यूज नेटवर्क
प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनतर्फे २१ला ‘महिला कलाविष्कार’ !!
पुणे : विदुषी सानिया पाटणकर यांच्या प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनतर्फे महिला दिनानिमित्त शुक्रवार, दि. २१ मार्च रोजी ‘महिला कलाविष्कार’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात होणार आहे.
अहमदाबाद येथील बनारास घराण्याच्या प्रसिद्ध तबला वादक हेतल मेहता यांचे एकल तबला वादन, हिंदी सा रे ग म फेम ज्ञानेश्र्वरी घाडगे आणि सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात हजेरी लावलेल्या शाश्र्वती चव्हाण-झुरुंगे यांचे गायन होणार आहे. कार्तिकी घाडगे, ऋषिकेश जगताप, महेंद्र शेडगे, माधव लिमये, यशवंत थिटे, दीपक दसवडकर साथसंगत तर कार्यक्रमाचे निवेदन नितीन महाबळेश्वरकर करणार आहेत.
विवेक सुरा आणि चंद्रशेखर सेठ यांची विशेष उपस्थिती असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका कार्यक्रमस्थळी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळात मिळतील, अशी माहिती विदुषी सानिया पाटणकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.