गोल्डन आय न्यूज नेटवर्क
कलासक्त कल्चरल फाऊंडेनतर्फे सोमवारी ‘इनामदारी’ कार्यक्रम !
पुणे : अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार प्रसार करणे या उद्देशाने कार्यरत असलेल्या पुण्यातील कलासक्त कल्चरल फाऊंडेशन या संस्थेतर्फे गप्पा, गोष्टी आणि गाण्यांवर आधारित ‘इनामदारी’ या कार्यक्रमाचे आयोजन सोमवार, दि. 17 मार्च 2025 रोजी करण्यात आले आहे.
कौशल इनामदार
गाण्याची गोष्ट सांगणारा आणि गोष्टीतून गाणी गाणारा हा धमाल रंजक कार्यक्रम सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार आणि चैतन्य गाडगीळ, अमेय ठाकुरदेसाई, सोमेश नार्वेकर सादर करणार आहेत.
हा कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती कलासक्त कल्चरल फाऊंडेनचे अध्यक्ष श्रीरंग कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.