गोल्डन आय न्यूज नेटवर्क
आपल्या जीवनाचा स्वतः नायक व्हा’ पुस्तकाचे प्रकाशन!
पुणे : देशसेवेचे स्वप्न घेऊन भारतीय सैन्यासह नौदल आणि वायुसेना यात अधिकारी म्हणून भरती होऊ इच्छिणाऱ्या युवा पिढीला कॅप्टन आशा शिंदे-अलगप्पा यांनी लिहिलेले ‘आपल्या जीवनाचा स्वतः नायक व्हा’ हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असा विश्वास ब्रिगेडियर अजित आपटे (निवृत्त) यांनी व्यक्त केला.
मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषेत हे पुस्तक असून या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी आपटे बोलत होते. आमदार सुनील टिंगरे, ब्रिगेडियर महेश सपत्नेकर (निवृत्त), ब्रिगेडियर एस. एस. जाधव, पुष्पा नलावडे, नितीन नलावडे, नाम फाउंडेशनचे गणेश थोरात आदी उपस्थित होते. ऑफिसर मेस येथील सभागृहात हा कार्यक्रम झाला.
आपल्या जीवनाचा स्वतः नायक व्हा’ पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी उपस्थित मान्यवर.
पदवीधर युवकांना सैन्यदल, नौदल, वायुसेना, यासह पॅरामिलिटरी, एव्हिएशन आणि तत्सम विभागात अधिकारी म्हणून आपली सेवा रुजू करता यावी यासाठी मार्गदर्शन करणारे हे पुस्तक असल्याचे पुस्तकाच्या लेखिका कॅप्टन आशा शिंदे-अलगप्पा यांनी सांगितले.
आमदार सुनील टिंगरे पुष्पा नलावडे, नितीन नलावडे, सचिन भोसले, राजेंद्र सागवेकर, सुनील शर्मा, सुरेंद्रसिंग सोधी, नितीन नलावडे, जगदीश डाबी, आध्यात्मिक क्षेत्रात मैथिली अय्यर, रवी अय्यर, नूतन बोराटे, सुषमा गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कॅप्टन सुखविंद कौर यांनी केले.
—————————––——————————————
जाहिरात