गोल्डन आय न्युज नेटवर्क
*मराठी रंगभूमी दिवस यानिमित्त भांडुपमध्ये साकार झाला Swaru Entertainment प्रस्तुत “रंग कलेचा” आणि कलाविष्कार फाऊंडेशन आयोजित “भांडुपचे ड्रामेबाज” या राज्यस्तरिय अभिनय स्पर्धेचा कलासोहळा.* !
सन्माननिय आमदार श्री. रमेशभाई कोरगांवकर, आदरणीय श्री. सतिश अधिकारी साहेब, सन्माननीय नगरसेविका सौ.जागृती ताई पाटील, शाखाप्रमुख श्री.प्रकाश सकपाळ, कु.दिक्षा कदम (श्री फाऊंडेशन ) यांची यावेळी उपस्थिती होती.
तसेच या कार्यक्रमात दिग्दर्शक श्री. स्वप्निल वारके ,भजनी कलावंत श्री.सुशील गोठणकर बुवा, बालकलाकार आदर्श कदम, कलाकार श्री.आदेश घडवले, लेखक दिग्दर्शक श्री.शैलेश निवाते आणि ‘माझं अस्तित्व’ नाटकाची संपूर्ण टिम, कलाकार दिग्दर्शक श्री.विश्राम चव्हाण, कलाकार दिपक कांबळी , नृत्य दिग्दर्शक नील आणि सुनील , त्याचप्रमाणे निवेदक श्री.किरण खोत सर यांची देखील आवर्जून उपस्थिती होती.
या कार्यक्रमामध्ये Swaru Entertainment संस्थेचा “रंग कलेचा” हा कार्यक्रम अगदी जल्लोषात आनंदात संपन्न झाला.हे तिसरे वर्ष असून यावेळी रंगभूमीशी आपलं नातं कसं जोडलं गेलं आणि आपणं रंगभूमीसाठी काय करु शकतो हे दर्शवणारी संकल्पना मायबाप प्रेक्षकांसमोर Swaru Entertainment मधील मेहनती सचिन , मयुरी, पंकज, मंगल, सार्थक, प्रियांका, स्नेहल, विशाल, हेतल, स्वरा, काव्या, निनाद आणि तृप्ती या कलाकारांनी अगदी सुंदर पद्धतीने सादर केली. यामध्ये नांदी,पारंपारिक गवळण, बतावणी, दशावतार,लावणी असे लोककला प्रकार सादर झाले. आवाज संगीत विद्यालयाचे विद्यार्थी आणि नृत्यांगना सौ.श्रिया चव्हाण यांचे देखील उत्तम नृत्य सादरीकरण झाले.
रंगभूमी दिनाचं औचित्य साधून कलाविष्कार फाऊंडेशन तर्फे गुरुवर्य कै.अशोक साळवी यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय एकपात्री स्पर्धा “भांडुपचे ड्रामेबाज” या स्पर्धेची अंतिम फेरी संपन्न झाली . काव्या गोडे प्रथम , वैष्णव पाटिल व्दितीय , वेदिका पवार तृतीय , व उत्तेजनार्थ स्वरा चाळके आणि तनिष्का तेली हे स्पर्धक यावेळी विजेते ठरले. सर्वच सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रक आणि विजेत्यांना रोख पारितोषिकेही देण्यात आली. परिक्षक सन्माननीय कविता विभावरी ( लेखिका व नाटय दिग्दर्शिका ) आणि श्री. चंदन हुलावळे ( कलावंत ) यांनी निकोप परिक्षण करुन स्पर्धकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे खुप गोड मंत्रमुग्ध करणारं सुत्रसंचालन सौ. शितल अजय भोवड यांनी केलं .
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री.सतीश अधिकारी ( महाराष्ट्र मंदिर ) , श्री.सुजय धुरत ( कोकण महोत्सव ) , आमदार श्री.रमेश भाई कोरगांवकर , उत्साही मित्र मंडळ अध्यक्ष श्री.विकास पाटील दादा , श्री.रितेश दादा सावंत , श्री.उमेश माने, श्री.प्रशांत देशमुख , श्री.अमोल दाभाडे , श्री.वेदांत मालणकर , संस्कार भारती कला संस्था , भांडुप कलाकार कट्टा , श्री.संदीप गचांडे ( मुक्तछंद नाटय संस्था ) , राजश्री गायकवाड ( SASSY ), श्री. स्वप्निल सावंत ( कोकण वैभव ) , श्री. अमित मुरकर ( Magic World Creations ) , श्री.गजानन , श्री.संदीप राजापुरकर या मान्यवरांनी मोलाचं योगदान दिले .
Swaru Entertainment संस्थेचे संस्थापक स्वरूप सावंत, सहसंचालक प्रकाश गोडे त्याचप्रमाणे वेदांत, संतोष पाटील, संकेत सारंग, निलेश मेस्त्री, मयुर निकम,प्रथमेश , हास्या आणि निखिल चव्हाण यासर्वांनी कार्यक्रमांचे सुयोग्य नियोजन केले होते आणि हा कार्यक्रम पाचमंदिर सभागृह भांडुप येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सर्वच कलाकारांनी खुप मेहनत घेतली होती हे दिसून आलं.
जाहिरात