गोल्डन आय न्यूज नेटवर्क
विनोदमूर्ती प्रकाश इनामदार स्मृती एकांकिका स्पर्धेचे शुक्रवारी पारितोषिक वितरण!!
पुणे : विजय पटवर्धन फाऊंडेशन आयोजित विनोदमूर्ती प्रकाश इनामदार स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार, दि. 8 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष असून स्पर्धेत 33 संघांचा सहभाग आहे. स्पर्धा भरत नाट्य मंदिरात सुरू आहे. स्पर्धेचा समारोप शुक्रवारी होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता पारितोषिक वितरण समारंभ प्रसिद्ध अभिनेते, लेखक, दिग्दर्शक योगेश सोमण यांच्या हस्ते होणार असून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला ईनामदार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती विजय पटवर्धन फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय पटवर्धन यांनी निवेदनाद्वारे दिली.
सुनील गोडबोले यांना प्रकाश इनामदार स्मृती पुरस्कार!!
विजय पटवर्धन फाऊंडेशनतर्फे विनोदमूर्ती प्रकाश इनामदार स्मृती प्रथम पुरस्कार चित्रपट, मालिका आणि नाटक या माध्यमांद्वारे आपल्या अभिनयातून रसिकांना मनसोक्त हसवून त्यांना हास्याच्या दुनियेत रममाण करणारे ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले यांना देण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे वितरण एकांकिका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभादरम्यान होणार असल्याचे विजय पटवर्धन यांनी सांगितले.
जाहिरात