गोल्डन आय न्यूज नेटवर्क
नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित
अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना रविवारी प्रमाणपत्र वितरण !
पुणे : नाट्यसंस्कार कला अकादमी आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठातील ललित कला केंद्रातर्फे घेण्यात आलेल्या अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम वर्गातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण आणि ज्येष्ठ लेखिका कै. सुमनताई शिरवळकर स्मृतीप्रित्यर्थ घेण्यात आलेल्या सुमन नाट्यछटा लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दि. 5 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
मराठी रंगभूमी दिनाच्या मुहुर्तावर आयोजित कार्यक्रम सकाळी 11 वाजता सरिता विद्यालय, मित्रमंडळ सोसायटी, पर्वती पायथा येथे होणार आहे. ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख डॉ. प्रविण भोळे आणि लेखक, दिग्दर्शक, अभिनेते दिग्पाल लांजेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी निवेदनाद्वारे दिली.
जाहिरात