गोल्डन आय न्यूज नेटवर्क
भागवताचार्य मोहनदास महाराज यांची पत्रकार आत्माराम ढेकळे यांना भेट !!
पुणेः- प्रसिध्द भागवताचार्य मोहनदास महाराज यांनी पुणे दौऱ्यावर असतांना पत्रकार आत्माराम ढेकळे यांची भेट घेऊन श्री क्षेत्र पैठण येथील श्री.राधाकृष्ण मंदिर च्या पुढील प्राणप्रतिष्ठा व इतर कार्यक्रमाच्या आढाव्या बद्दल माहिती दिली.
पुणे दौऱ्यात खेड तालुक्यातील ‘ओंकारेश्वर देवस्थान श्री क्षेत्र चांदुस येथे ‘महाशिवरात्र उत्सव ‘निमित्ताने भागवताचार्य मोहनदास महाराज पैठणकर यांचे हरिकिर्तन संपन्न झाले.
या दौऱ्यात प्रामुख्याने प्रसिध्द पत्रकार आत्माराम ढेकळे यांची भेट घेऊन त्यांच्या समवेत पुणे परिसरातील विविध ठिकाणच्या भाविक भक्तांनाही त्यांच्या निवासस्थानी भेटी देऊन सत्संग केला. व प्रकाशित”नाथनगरी दिनदर्शिका -२०२५ ” यावेळी भेट म्हणुन संपर्कभेटीत सर्वांना देण्यात आली.
पुणे संपर्क दौऱ्यात शास्त्रीय संगीत विशारद आचार्य पं.सुधाकर चव्हाण ,झी टाॕकीज सल्लागार गंभीर महाराज अवचार यांचेसी पैठण येथील श्री राधाकृष्ण मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमा बाबत भव्य कार्यक्रमाच्या नियोजना बद्दल व सहभाग यासंबधी सविस्तर चर्चा करण्यात आली.
तसेच याप्रसंगी पुणे येथे “संगीतमय श्रीम द् भागवत कथा ” कार्यक्रमाचेही आयोजन व्हावे असे श्री.राधाकृष्ण मंदिर,श्री क्षेत्र पैठण चे संस्थापक अध्यक्ष भागवताचार्य मोहनदासजी महाराज यांनी मनोदय व्यक्त केले.व त्यास प्रतिसाद ही मिळाला.त्यांच्या सोबत लातुरचे सहकारी श्री अंकुश काळे हे होते.