Marathi FM Radio
Wednesday, March 12, 2025

प्रभा अत्रे यांचा राग-समयसिद्धांत पुढील पिढीला उपकारक : पंडित सुरेश तळवलकर !!

Subscribe Button

गोल्डन आय न्यूज नेटवर्क

Advertisement

प्रभा अत्रे यांचा राग-समयसिद्धांत पुढील पिढीला उपकारक : पंडित सुरेश तळवलकर !

‌‘रागप्रभा विचार संचित‌’ पुस्तिकेचे प्रकाशन : ‌‘रागप्रभा संगीतोत्सवा‌’चा समारोप.!!

पुणे : अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या परंपरेची मूल्य बुजुर्ग कलाकारांनी जपणूक करत बदलातून रुजवली आहेत. आजच्या कलाकारांनी चौकटीबाहेर जाऊन सादरीकरणासाठी मानसिकता तयार करणे आवश्यक आहे. किराणा घराण्याच्या विचारवंत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी अनेक वर्षांच्या साधनेतून रागप्रहरांच्या संकल्पनांपासून मुक्त संगीत सादरीकरणाची भूमिका मांडली.

Advertisement

Advertisement

राग-समयसिद्धातांविषयीचे विचार पुढील पिढीतील कलाकारांना उपकारक ठरतील, असे प्रतिपादन तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांनी केले.
राग प्रहरांच्या कालबाह्य संकल्पनांपासून मुक्त ‌‘रागप्रभा संगीतोत्सवा‌’चे डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनतर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. संगीतोत्सवातील दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी ‌‘रागप्रभा विचार संचित‌’ या पुस्तिकेचे प्रकाशन पंडित तळवलकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

Advertisement

संतूरवादक ताकाहिरो अराई, प्रसिद्ध गायक श्रीनिवास जोशी, प्रभा अत्रे फाऊंडेशनचे सल्लागार अनिरुद्ध वळसंगकर, कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे मंचावर होते.

Advertisement


राग प्रहरांच्या कालबाह्य संकल्पनांविषयी गेली अनेक वर्षे प्रभाताईंचे विचार ऐकत आलो आहे, असे सांगून पंडित तळवलकर म्हणाले, या विचारांमागे प्रभाताईंच्या साधनेची ताकद आणि मूल्ये आहेत.

हे विचार परंपरा मोडावी म्हणून नव्हे तर सादरीकरणात मुभा असावी म्हणून पुढे आले आहेत. मैफलीच्या वेळा ठराविकच असल्याने राग प्रहराची ही चौकट मोडली जाणे आवश्यक आहे. राग-तालांच्या प्रकृतीशी साधर्म्य साधणारे रागसंगीत सादर व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ताकाहिरो अराई यांचे संतूरवादनाने झाले. त्यांनी राग बसंत मुखारीमधील आलाप, जोड, झाला सादर करून विलंबित रूपक ताल आणि मध्यलय एकताल याचे प्रभावी सादरीकरण केले. त्यांना अजिंक्य जोशी यांनी तबलासाथ केली. अराई यांच्या प्रभावी सादरीकरणाला रसिकांनी उभे राहून दाद दिली.

किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक श्रीनिवास जोशी यांनी राग तोडी सादर करून मध्यलय त्रितालमधील ‌‘लंगर कांकरिया जी न मारो‌’ आणि ‌‘नी मै मसरत पुछनिया तुसा‌’ ही पंजाबी बंदिश सादर केली. भरत कामत (तबला), अविनाश दिघे (संवादिनी), चेतन आमटे, स्वप्नील गायकवाड (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

v

रागांचा विचार मनात न ठेवता सुरांशी एकरूपता साधत मैफलीचा भरभरून आनंद घ्यावा, अशा शब्दांत रसिकांशी संवात साधत पंडित विनायक तोरवी यांनी मैफलीची सुरुवात राग अहिर भैरवने केली. विलंबित एकतालातील ‌‘रसिया म्हारे‌’ ही बंदिश सादर केल्यानंतर द्रुत तीन तालातील ‌‘मनवा तु जागत‌’ ही पारंपरिक बंदिश ऐकविली. या नंतर राग जौनपुरी सादर केला. मैफलीची सांगता अल्हैय्या बिलावल रागातील द्रुत तीन तालातील ‌‘कवन बटरिया‌’ या बंदिशीने केली. त्यांना भरत कामत (तबला), राहुल गोळे (संवादिनी), चेतन आमटे, स्वप्नील गायकवाड (तानपुरा), सिद्धार्थ बेलमण्णू (सहगायन) यांनी साथसंगत केली.

त्यानंतर सुप्रसिद्ध गायिका विदुषी अलका देव-मारुलकर यांनी राग ललतमधील विलंबित तीन तालातील ‌‘आत्मरूप लखायो गुरू‌’ ही स्वरचित बंदिश अतिशय सुमधूरपणे सादर केली. या बंदिशीला जोडून द्रुत एकतालातील तराणा ऐकवून राग विभासमधील ‌‘हे करो मंगल नाम तेरो सदाशिव‌’ या बंदिशीने मैफलीची सांगता केली. अजिंक्य जोशी (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), शिवानी मारुलकर-दसककर, शिवानी मोघे (तानपुरा, सहगायन) यांनी साथसंगत केली.
रागप्रभा संगीतोत्सवाची सांगता पद्मश्री पंडित उल्हाश कशाळकर यांच्या गायनाने झाली. ‌

‘एरि मा पी संग खेले‌’ या हिंडोल रागातील वसंत ऋतुचे वर्णन करणाऱ्या बंदिशीने मैफलीची सुरुवात झाली. हिंडोलबहार रागातील ‌‘माई री आज‌’ ही बंदिश सादर करून कशाळकर यांनी मैफलीची सांगता ‌‘कान कुंवर मोसे करत बरजोरी‌’ या भैरवीने करताना आपल्या आवाजाच्या जादूने रसिकांना मोहित केले.

तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांनी तबला तर सुयोग कुंडलकर यांनी संवादिनीवर साथ केली. पुष्कर भागवत, अद्वैत केसकर यांनी तानपुरा साथ व सहगायन केले.

कलाकारांचा सत्कार श्रीनिवास जोशी, प्रा. प्रकाश भोंडे, कुमुद धर्माधिकारी, शीला देशपांडे, डॉ. रघुवीर कुलकर्णी यांनी केला.

 

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular