डॉ. दीपक शिकारपूर यांचे रविवारी ए आय आणि संधी’ विषयावर व्याख्यान !!
पुणे : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी, प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांचे ‘ए आय आणि संधी’ या विषयावर पुणे नगर वाचन मंदिरातर्फे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
वाचक कट्टा या उपक्रमाअंतर्गत आयोजित व्याख्यान रविवार, दि. 16 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता लक्ष्मी रस्त्यावरील पुणे नगर वाचन मंदिर, 181 बुधवार पेठ येथे आयोजित करण्यात आले आहे. डॉ. शिकारपूर गेली चार दशके माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत.
विविध वृत्तपत्रातून येणारे लेख, 60 पुस्तके, अभ्यासपूर्ण व्याख्याने, समुपदेशन या मार्गाने ते कौशल्यतेने परिपूर्ण व सक्षम युवा पिढी घडवू इच्छित आहेत. दृष्टिहीन विद्यार्थीही संगणक साक्षर व्हाव्ोत यासाठी डॉ. शिकारपूर यांची विविध पुस्तके ब्रेल लिपिमध्ये रुपांतरीत करण्यात आली आहेत. ज्यांचा वापर राज्यभरातील अनेक दृष्टिहीन विद्यार्थी नियमितपणे करीत आहेत.