गोल्डन आय न्युज नेटवर्क
युवा सेना आयोजित हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला सुरुवात !
पुणे : युवा सेना आयोजित हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे करंडक खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला आज (दि. 3) बालगंधर्व रंगमंदिरात सुरुवात झाली. स्पर्धेत राज्यातील 24 संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेला एम.आय.टी.च्या डब्ल्यू. पी. यू. स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सने सादर केलेल्या ‘अगम्य’ या एकांकिकेने झाली.
युवा सेनेचे राज्य सचिव किरण साळी आणि युवा सेनेचे पुणे शहर चिटणीस कौस्तुभ कुलकर्णी यांच्या पुढाकारातून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बालगंधर्व रंगमंदिरात एकांकिका स्पर्धांचे क्वचितच आयोजन होते. युवा सेनेतर्फे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात केल्याने बालगंधर्व रंगमंदिरातील मंचावर एकांकिका सादर करण्यास मिळत असल्याने सहभागी स्पर्धकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.
युवा सेना आयोजित हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे करंडक खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित शुभांगी दामले, सुरेश देशमुख, किरण साळी, सुनील महाजन, कौस्तुभ कुलकर्णी आदी.
दि. 3 ते 5 ऑक्टोबर या कालावधीत या स्पर्धा होत आहे. स्पर्धा बघण्यासाठी सर्वांना प्रवेश खुला आहे.स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी दामले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि तिसरी घंटा देऊन झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या वेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे माजी अध्यक्ष सुरेश देशमुख, स्पर्धेच्या परीक्षक अनुपमा कुलकर्णी, मंजुषा जोशी, संजय डोळे, युवा सेनेचे राज्य सचिव किरण साळी, युवा सेनेचे पुणे शहर चिटणीस कौस्तुभ कुलकर्णी, युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश घारे, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ युवा सेना अध्यक्ष आकाश शिंदे, निळू फुले कला अकादमीचे विश्वस्त मिहिर थत्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यातील हौशी कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी युवा सेनेच्या माध्यमातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंडक खुल्या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याचे युवा सेनेचे राज्य सचिव किरण साळी यांनी प्रास्ताविकात सांगितले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सभारंभ दि. 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला आहे.
युवा सेना आयोजित हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे करंडक खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे तिसरी घंटा वाजवून उद्घाटन करताना शुभांगी दामले. समवेत सुरेश देशमुख, किरण साळी, सुनील महाजन, कौस्तुभ कुलकर्णी आदी.
उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना शुभांगी दामले म्हणाल्या, मनोरंजन हे संघटनाचे मोठे माध्यम आहे. मनोरंजानाची सुरुवात स्पर्धांमधूनच होत असते. पर्यायाने स्पर्धांचा उपयोग संघटन करण्यासाठी होत आहे. स्पर्धेचे आयोजक आणि सहभागी स्पर्धकांंना शुभेच्छा.
स्पर्धा सर्व रसिकांसाठी खुली असून स्पर्धेचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन कौस्तुभ कुलकर्णी यांनी केले.मान्यवरांचा सत्कार किरण साळी, सुनील महाजन, आकाश शिंदे, निलेश घारे, शर्वरी गवांडे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका जोशी यांनी केले.
जाहिरात