Marathi FM Radio
Wednesday, February 5, 2025

आंत्रप्रेन्युअर्स स्टार ॲवॉर्ड्‌‍स वितरण सोहळा शनिवारी !!

Subscribe Button
गोल्डन आय न्यूज नेटवर्क

आंत्रप्रेन्युअर्स स्टार ॲवॉर्ड्‌‍स वितरण सोहळा शनिवारी !

पुणे : औद्योगिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या उद्योजकांचा अर्थार्थ वेल्थ मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड पुणे, एसएमई चेंबर ऑफ इंडिया यांच्या वतीने आंत्रप्रेन्युअर्स स्टार ॲवॉर्ड्‌‍स 2025 ने सन्मान केला जाणार आहे.

Advertisement

पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. 8 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. सहसंवाद फाऊंडेशन यांच्या सहयोगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement


सेंटर फॉर पोलिस रिसर्च ऑडिटोरियम, पाषाण रोड येथे हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 2 वाजेपासून उद्योग-व्यावसायिकांचे प्रेझेंटेशन होणार असून सायंकाळी 5 वाजता पुरस्कार वितरण सभारंभ होणार आहे.

Advertisement

पुरस्कारांचे वितरण उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, उच्च व तंत्रज्ञान शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती अर्थार्थ वेल्थ मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या अध्यक्षा स्मिता भोलाणे, सहसंवाद पुणेच्या प्रमुख केतकी महाजन-बोरकर आणि संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

Advertisement

या प्रसंगी महाराष्ट्र इंडस्ट्रीअल टाउनशीपचे कार्यकारी अध्यक्ष पी. डी. मलिकनेर, महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट असोसिएशन ॲन्ड एसएमइ चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक, अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे तसेच चितळे बंधू मिठाईवालेचे केदार चितळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Advertisement

पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन अर्थार्थ वेल्थ मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे निरज भाटीया, किरण भोलाणे, असोसिएशन ऑफ व्हॅल्यूएशन प्रोफेशनल्सचे राममोहन भावे, सहसंवाद फाऊंडेशनच्या केतकी महाजन-बोरकर यांनी केले आहे.

व्यावसायिक जगतात एमएसएमइ, एसएमइ, उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र, रिअल इस्टेट, आर्किटेक्चर अशा उद्योग क्षेत्रात नाविन्यपूर्ण, कल्पक आणि भरीव कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील 30 उद्योजकांचा आंत्रप्रेन्युअर्स स्टार ॲवॉर्ड्‌‍सने सन्मान केला जाणार आहे.

वुमेन आंत्रप्रेन्युअर्स डेव्हलपमेंट कौन्सिल, असोसिएशन ऑफ व्हॅल्यूएशन प्रोफेशनल्स, बीएसई, एलआयसी म्युच्युअल फंड, जनसेवा सहकारी बँक लिमिटेड, हडपसर, भगिनी निवेदिता सहकारी बँक लि. पुणे, बिझनेस आयकॉन यांचे कार्यक्रमास सहकार्य लाभले आहे.

 

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular