गोल्डन आय न्यूज नेटवर्क
सुवर्णपुष्प प्रकाशन समारंभात पत्रकार आत्माराम ढेकळे यांचा सत्कार !!
पुणे- (महाराष्ट्र ) येथील प्रसिध्द पत्रकार आत्माराम ढेकळे यांचा सुरत (गुजरात)येथे सुवर्णपुष्प प्रकाशन समारंभात मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करुन सत्कार करण्यात आला*
अखिल भारतीय स्वर्णकार समाज विकास एवं शोध संस्थान..दिल्ली स्थित (ABSSVSS)च्या राष्ट्रीय महिलाअध्यक्षा पुष्पाताई सोनार लिखित सुवर्ण पुष्प भाग-२ या पुस्तकाचे प्रकाशन या (ABSSVSS)संस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.के.राजपुतजी यांच्या हस्ते संत नरहरी सत्संग भवन,सुरत येथे नुकतेच संपन्न झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ABSSVSSचे गुजरात प्रदेश संगठनमंत्री गजाननजी वानखेडे हे होते.
तर समारंभास प्रामुख्याने पुणे (महाराष्ट्र )येथील प्रसिध्द पत्रकार आत्माराम ढेकळे यांना मुख्य अतिथी म्हणुन निमंत्रण देण्यात आले होते.कार्यक्रमास विविध प्रदेशातुन प्रमुख अतिथी व मुख्यअतिथी म्हणुन मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सर्वांचा सन्मान याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
.त्यामध्ये पत्रकारिता क्षेत्र व या संस्थान च्या माध्यमातून आत्माराम ढेकळे यांनी केलेल्या कार्याचा गौरव करुन या संस्थानचे (ABSSVSS)राष्ट्रीय अध्यक्ष एम.के.राजपुतजी यांच्या हस्ते प्रसिध्द भागवत कथाकार सौ. अंजलीताई अनासने व सुवर्णपुष्प पुस्तकाच्या लेखिका श्रीमती पुष्पाताई सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी रूग्वेद ‘सुवर्णवार्ता ‘स्वर्णकार समाज प्रसार वाहिणीचे मुख्य संचालक दिनेशजी येवले ,योगगुरु सौ.अर्चनाताई सोनार,प्रा.ईश्वर सोनार आदींनी सत्कारमुर्ती ढेकळे यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा व्यक्त केल्या.