गोल्डन आय न्यूज नेटवर्क
गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या ‘कथा आमच्या शिक्षणाची’ नाटिकेस भालबा केळकर करंडक !!
नानासाहेब शिरगोपीकर करंडक कला केंद्र, पुणेच्या ‘माझा बाप्पा’ला !!
पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर नाटिका स्पर्धेत मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाने (टिळक रोड) सादर केलेल्या ‘कथा आमच्या शिक्षणाची’ या नाटिकेने भालबा केळकर करंडक पटकाविला. विजेत्या संघास भालबा केळकर करंडक, स्मृतिचिन्ह व रोख तीन हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. नाविन्यपूर्ण व कल्पक सादरीकरणाचा नानासाहेब शिरगोपीकर करंडक, स्मृतिचिन्ह व दोन हजार 500 रुपये रोख पारितोषिक कला केंद्र, पुणेच्या ‘माझा बाप्पा’ या नाटिकेस जाहीर झाला आहे.
महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर नाटिका स्पर्धा दि. 11 व 12 जानेवारी रोजी भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत 19 संघांचे सादरीकरण झाले. रविवारी रात्री निकाल जाहीर करण्यात आला. सांघिक द्वितीय कृष्णदेव मुळगुंद करंडक, स्मृतिचिन्ह व दोन हजार रुपये रोख आर्यन्स वर्ल्ड स्कूल, वारजे संघाने सादर केलेल्या ‘व्हाईट वॉश’ या नाटिकेला तर सांघिक तृतीय क्रमांक राजा भाऊ नातू करंडक, स्मृतिचिन्ह व एक हजार रुपये रोख नवीन मराठी शाळा पुणेच्या ‘जीवन त्यांना कळले हो!’ या नाटिकेस जाहीर करण्यात आला आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल :
अभिनय नैपुण्य उत्तेजनार्थ पारितोषिक (प्रमाणपत्र व कै. भालबा केळकर यांच्या कुटुंबियांकडून प्रत्येकी शंभर रुपयांचे रोख पारितोषिक/कलाकार, भूमिका, नाटिका, संघाचे नाव या क्रमाने) :
आरुष बोपर्डीकर (छोकू, एकाच तिकिटात तीन बालनाट्ये, आर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी), नील देशपांडे (देण्या, मिशन गणपती, नाटकाची शाळा, पुणे), राजवी बामगुडे (आई व शिरीन, चि. का. गो., भारतीय विद्या भवन परांजपे विद्या मंदिर, कोथरूड), मीरा आडकर (मीरा व प्रमिला, पणजीची गोष्ट, श्रीनिवास सिरीन काऊंटी एबीसी को-ऑप सोसायटी), देवप्रशांत सूर्यवंशी (रघु, शेवटचा गणपती, शिशुविहार प्राथमिक शाळा, एरंडवणा), स्वरांश लेले (काकु, रंगीत गोष्ट, आकांक्षा बालरंगभूमी), हर्ष गारोळे (काळ्या, वाढदिवस, मानव्य, पुणे), विवान कुलकर्णी (बाबा, मॅजिक फॅक्टरी, एसपीएम इंग्लिश स्कूल, पुणे), अर्जुन दारव्हेकर (अर्जुन व मॉनिटर, मॉनिटर, स्वरसाधना, पुणे), रित्वी करडे (चेटकीण नं. 2, एकाच तिकिटात तीन बालनाट्ये, आर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी).
सर्वोकृष्ट लेखन : (सुमन शिरवटकर पुरस्कृत करंडक, स्मृतिचिन्ह व 501 रुपये रोख) : निखिल गाडगीळ (एकाच तिकिटात तीन बालनाट्ये, आर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी).
उत्तेजनार्थ : (प्रदीप जंगम पुरस्कार, स्मृतिचिन्ह व 251 रुपये रोख) : भैरवी पुरंदरे (मिशन गणपती, नाटकाची शाळा).
सर्वोकृष्ट दिग्दर्शक : (दिनानाथ टाकळकर करंडक, स्मृतिचिन्ह व 501 रुपये रोख) : संतोष माकुडे (माझा बाप्पा, कला केंद्र पुणे)
उत्तेजनार्थ : (प्रमाणपत्र व 251 रुपये रोख) : अमृता जोगदेव (व्हाईट वॉश, आर्यन्स वर्ल्ड स्कूल, वारजे).
अभिनय नैपुण्य : अभिनेता : (सतिश तारे पुरस्कार, स्मृतिचिन्ह व 251 रुपये रोख) : आरुष खानझोडे (वरद, माझा बाप्पा, कला केंद्र, पुणे)
अभिनय नैपुण्य : अभिनेत्री : (शितल केतकर पुरस्कार, स्मृतिचिन्ह व 251 रुपये रोख) : नंदिनी यावलकर (सूत्रधार 1 व इंद्र, जीवन त्यांना कळले हो!, नवीन मराठी शाळा, पुणे).
वाचिक अभिनय नैपुण्य : (स्मृतिचिन्ह व 501 रुपये रोख) : अक्षरा जोशी (जेरी, व्हाईट वॉश, आर्यन्स वर्ल्ड स्कूल, वारजे)
सर्वोकृष्ट वैयक्तिक अभिनय नैपुण्य (प्रभाकर वाडेकर पुरस्कार, स्मृतिचिन्ह व 501 रुपये रोख) : गार्गी वैद्य (नटी, कथा आमच्या शिक्षणाची, मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, टिळक रोड).
स्पर्धेचे परिक्षण अनिरुद्ध दिंडोरकर, राजू बावडेकर व केतकी पंडित यांनी केले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार, दि. 16 रोजी सायंकाळी 5 वाजता भरत नाट्य मंदिर येथे इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष प्रसाद वनारसे यांच्या हस्ते होणार आहे.