Marathi FM Radio
Monday, January 13, 2025

भारतातील पहिल्या ॲडव्हायझर्स वेलफेअर असोसिएशनची स्थापना !!

Subscribe Button
गोल्डन आय न्यूज नेटवर्क

भारतातील पहिल्या ॲडव्हायझर्स वेलफेअर असोसिएशनची स्थापना !!

पुणे : भारतात प्रथमच सल्लागार सदस्यांच्या पुढाकारातून ॲडव्हायझर्स वेलफेअर असोसिएशनची स्थापना चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत करण्यात आली आहे.

Advertisement

भारतातील पहिल्या ॲडव्हायझर्स वेलफेअर असोसिएशनची स्थापना !!

Advertisement

Advertisement

असोसिएशनची पाहिली सार्वजनिक महासभा नुकतीच पुणे येथे आयोजित करण्यात आली होती.या असोसिएशनमध्ये 250 पेक्षा अधिक सदस्य असून सभेत 120 पेक्षा अधिक सदस्यांनी सहभाग घेतला होता. सभेमध्ये पुणे तसेच बारामती, संभाजीनगर येथील सदस्य सहभागी झाले होते. विषयपत्रिकेनुसार खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली आणि नवीन कार्यक्रारिणीची निवड एकमताने करण्यात आली.

Advertisement

Advertisement

 

सदस्यांना बॅकिंग क्षेत्राच्या नवनवीन धोरणांविषयी माहिती देण्यासाठी प्रशिक्षण, रक्तदान, वृक्षारोपण, क्रीडा, सामूहिम, सामाजिक उपक्रम तसेच आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन ॲडव्हायझर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. सदस्यांना आर्थिक स्थैर्य लाभावे याकरिता समुपदेशन, त्यांच्या तक्रारींचे निराकरण याचप्रमाणे केंद्र-राज्य सरकार अथवा स्थानिक प्रशासकीय संस्था यांच्याशी संवाद, सायबर सुरक्षा आणि फसवणुकीसंदर्भात जागरुकता निर्माण करणे, कर्जविषयक माहिती देणे, सदस्यांचे आर्थिक कल्याण करण्याकरिता विविध संसाधनांची मदत याच प्रमाणे सदस्यांच्या सामाजिक कल्याणासाठी कर्ज सल्ला, आर्थिक सल्ला यामधील दुवा बनत संपूर्ण देशाला एका छताखाली आणण्याचा प्रयत्न असोसिएशनच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे सांगितले.

ॲडव्हायझर्स वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रकाश झा यांची तर उपाध्यक्षपदी संजय खंडारे आणि अविनाश वाकचौरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणीत सचिव मंदार पुजारी, उपसचिव गिरीश टोलीवाल, खजिनदार शशांक आंबर्डेकर, उपखजिनदार ज्ञानेश्वर उगले यांचा समावेश आहे.

ही संस्थां स्थापने मध्ये Adv. सत्येन नायर  यांनी  विशेष कायदेशीर सल्लागार म्हणुन काम बघितले.

सामान्य प्रशासक आणि सामाजिक कार्य शाखेत निलेश कांबळे, विजय पानसरे, महिला विभाग आणि सोशल मीडिया विभागात रीना सोमय्या, मनिषा कामठे, क्रीडा विभागात संजय खंडारे, विजय पानसरे तर सल्लागार सदस्य म्हणून विवेक साहू आणि इरेश पाटील यांचा समावेश आहे.

जास्तीत जास्त कर्ज सल्लागारांनी यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठीया email.awass@ gmail.com ई-मेलवर संपर्क करावा.

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular




More forecasts: oneweather.org