गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘नवप्रेरणा’ सांगीतिक कार्यक्रमाचे मंगळवारी आयोजन !!
पुणे : नववर्ष आणि संक्रांतीनिमित्त प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनतर्फे ‘नवप्रेरणा’ या सांगीतिक कार्यक्रमाचे मंगळवार, दि. 14 जानेवारी 2024 रोजी आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियम, कोथरूड येथे आयोजित करण्यात आला आहे.
सानिया पाटणकर
या कार्यक्रमात प्रथमच दिव्यांग, अंध, स्वमग्न कलाकार गायन-वादन सादर करणार आहेत. भूषण तोष्णीवाल, गौरी गंगाजळीवाले तसेच बालकल्याण संस्थेतील दिव्यांग यांचा सहभाग असणार आहे.
कार्यक्रमाचा समारोप प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनच्या संचालिका विदुषी सानिया पाटणकर यांच्या गायनाने होणार आहे. विनायक गुरव, दत्तात्रय भावे, माधव लिमये साथसंगत करणार आहेत. महाबळेश्वर परिवारातर्फे दिल्या जाणाऱ्या ‘मातोश्री अवॉर्ड’ने सुप्रसिद्ध गायिका राजश्री रानडे यांना सन्मानित केले जाणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.