व्हावे कौतुक स्त्री संघकौशल्याचे,
त्याचसाठीच व्यासपीठ हे हक्काचे…
“अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे” च्या वतीने सालाबाद प्रमाणे साजऱ्या होणाऱ्या मंडई म्हसोबा उत्सवानिमित्त आयोजित “पुणे शहर व जिल्हा उत्कृष्ट महिला बचत गट स्पर्धा (सन २०२३)”
महिला सक्षमीकरणाचा प्रामाणिक हेतू समोर ठेऊन आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये एकूण १० लाख रुपयांची पारितोषिके बहाल केली जाणार आहेत. या दरम्यान भव्य लकी ड्रॉच्या माध्यमातून काही भाग्यवान महिलांना मौल्यवान भेटवस्तू प्राप्त करण्याची संधी ही ट्रस्टने देऊ केली आहे. उपस्थित प्रत्येक महिलेला भेटवस्तू अन् अल्पोपहाराची सोय देखील करण्यात येणार आहे.
तेव्हा, वेळ न दवडता सोबत दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून जास्तीत जास्त महिला बचत गटांनी सहभागी व्हावे आणि ही माहिती सर्वदूर पसरवून आम्हासही जास्तीत जास्त गटांपर्यंत पोचण्यास मदत करावी. तसेच, नियोजित कार्यक्रमास आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही ट्रस्टच्या वतीने नम्र विनंती…!!
कार्यक्रमाची तारीख आणि वेळ :मंगळवार दिनांक १८ जुलै २०२३ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी २:०० वाजे पर्यंत
कार्यक्रम स्थळ : गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे
महिला बचतगट नाव नोंदणीसाठी अधिकृत संपर्क:
मा. सरिकाताई निंबाळकर (स्पर्धा प्रमुख)
7071729494
9922088377
9423085475
7071729898
आपले विनीत:
राहुल सदाशिव सूर्यवंशी
(विश्वस्त अध्यक्ष: अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे)
निवृत्ती विजय जाधव
(विश्वस्त उपाध्यक्ष: अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे)
प्रायोजक:
Lord Venkateshwara Charitable and Religious Trust.
Manikchand (Prakash R. Dhariwal)
टीप: महिला बचत गटांच्या व्यतिरिक्त इतर महिलांनाही सदर कार्यक्रमास विनामूल्य प्रवेश मिळेल.
जाहिरात –
जाहिरात