गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पंडित बबनराव हळदणकर स्मृती ‘स्वरआदरांजली’ संगीत मैफलीचे रविवारी आयोजन !!
पुणे : आग्रा घराण्याचे थोर गायक आणि बंदिशकार कै. पंडित बबनराव हळदणकर स्मृतिप्रित्यर्थ गानवर्धन आणि पंडित बबनराव हळदणकर यांच्या शिष्यवर्गातर्फे रविवार, दि. 29 डिसेंबर रोजी ‘स्वरआदरांजली’ या शास्त्रीय गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
मानस विश्वरूप
गायन मैफल सकाळी 9 वाजता लोकमान्य हॉल, केसरी वाडा येथे आयोजित करण्यात आली आहे. या मैफलीत सुप्रसिद्ध गायक मानस विश्वरूप आणि विख्यात गायिका कविता खरवंडीकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. कलाकारांना उदय कुलकर्णी (संवादिनी) आणि धनंजय खरवंडीकर (तबला) हे साथसंगत करणार आहेत, अशी माहिती गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
कविता खरवंडीकर
संभाजीनगर येथील युवा गायिका युगंधरा केचे हिला दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. युगंधरा ही पंडिता शुभदा पराडकर यांची शिष्या आहे. पंडित बबनराव हळदणकर लिखित आणि राज्य शासन पुरस्कारप्राप्त ‘जुळू पाहणारे दोन तंबोरे’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे तसेच ‘राग भेद आणि भावदर्शन’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध गायक पंडित अरुण कशाळकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.