गोल्डन आय न्युज नेटवर्क
भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक आघाडीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पुण्यातील 100 कलाकारांच्या मुलांना वह्या वाटप, शहर पातळीवर 80 कलाकारांचे सांस्कृतिक आघाडीत प्रवेश आणि मोदी@9 या कार्यक्रमाअंतर्गत टिफीन बैठक या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ह्या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्ष प्रियाताई बेर्डे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व 80 कलाकारांचे सांस्कृतिक आघाडीमध्ये स्वागत केले.
ह्या प्रसंगी सांस्कृतिक आघाडी शहर अध्यक्ष जतीन पांडे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री निर्माते अमर गवळी, धनंजय वाठारकर , माधुरी जोशी अवचट, अभिषेक अवचट, अँड केदार सोमण , विद्या पोकळेपाटील , गुरू कद्रेकर, अजय लोळगे , कुणाल शहा, नितीन मोरे, पुष्कर तावरे या पदाधिाऱ्यांनीही बहुमोल योगदान दिले.
पुण्यातील अनेक प्रतिभावंत साहित्यिक, चित्रकार,कलाकार यांनी या प्रसंगी सांस्कृतिक आघाडीत प्रवेश केला आहे.
सांस्कृतिक आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष जतीन पांडे यांनी पद स्वीकारल्यानंतर संघटन व उपक्रम या माध्यमातुन काम सुरू केले व हा विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले व ह्यात प्रदेशचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.
ह्या प्रसंगी प्रिया ताई बेर्डे , माधुरी जोशी व जतीन पांडे यांनी सर्व नव्या पदाधिकारी आणि सहकाऱ्यांचे स्वागत व अभिनंदन केले.
जाहिरात
जाहिरात