गोल्डन आय न्यूज नेटवर्क
ॲड. प्रमोद आडकर यांचा गुरुवारी एकसष्टीनिमित्त कृतज्ञता सन्मान !
पुणे : महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह, ज्येष्ठ संयोजक, लेखक, रंगत-संगत प्रतिष्ठान आणि रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांच्या एकसष्टीनिमित्त कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम गुरुवार, दि. 5 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे.
ॲड. आडकर यांचा सन्मान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार असून महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणीचे अध्यक्ष सचिन ईटकर, लता राजगुरू यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक विठ्ठल गायकवाड यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.