Marathi FM Radio
Wednesday, December 4, 2024

लग्न ठरवताय ? हे नियम पाळाच !

Subscribe Button

लग्न ठरवताय ? हे नियम पाळाच

👉 सर्व खरी व विस्तृत माहिती देऊन उत्तम बायोडाटा तयार करा.

Advertisement

👉 सुंदर स्मार्ट फोटो वापरा , क्लोजअप व पूर्ण असे दोन्ही फोटो जोडा.

Advertisement

👉 तुमचा बायोडाटा हेच तुमचे पाहिले इम्प्रेशन आहे म्हणून कोणतीही माहिती लपवू नका.

Advertisement

👉 बायोडाटा पाहूनच समोरचा कॉल करणार आहे म्हणून बायोडाटा कडे विशेष लक्ष द्या व तो आकर्षक बनवा.

Advertisement

👉 आपल्याला जे बायोडाटा चांगले वाटतात ते सिलेक्ट करून वेगळे स्टोअर करा.

Advertisement

👉 सिलेक्ट केलेल्या प्रोफाइलशी आपली पत्रिका जुळती का हे पहा.

👉 जर पत्रिका जुळत असेल तर स्वतः कॉल करा.

👉 कॉल करतांना नम्रपणे सर्व संदर्भ आधी द्या , आपले नाव व आपला परिचय द्या. बायोडाटा कोठून मिळाला व कॉल करण्यामागचा आपला उद्देश समोरच्याला सांगा. जर समोरचा घाईत असेल तर सवड काढून परत फोन करा पण घाई घाईत माहिती सांगू नका.

👉 जर समोरच्याने सांगितले तर आपला प्रोफाइल पाठवा.

👉 जर आपल्या कडे कोणी बायोडाटा पाठवला असेल तर त्यावर विचार करून नकार असेल तर तो लगेचच कळवा. गप्प बसून समोरच्याचा अपमान करू नका.

👉 जर आपल्याकडे आलेला प्रोफाइल चांगला वाटत असेल तर उत्तर देण्यासाठी वेळ मागून घ्या. जर विचार करायला जास्त वेळ लागत असेल तर समोरच्याला तशी कल्पना द्या.

👉 जर स्थळा विषयी बाहेरून काही माहिती काढायची असेल तर ती योग्य व्यक्ती कडूनच काढा म्हणजे चुकीच्या माहितीने हातातील चांगले स्थळ जाणार नाही.

👉 जर अजून काही माहिती हवी असल्यास डायरेक्ट फोन करून विचारा व योग्य वेळेत उत्तर द्या

👉 समोरच्याने फोन केला म्हणजे त्याला कमी लेखू नका किंवा त्याचा अपमान करू नका. जर आपल्या योग्य स्थळ नसेल तरी नम्रपणे लवकरात लवकर नकार कळवा.

👉 जर समोरच्याने नकार दिला किंवा तुम्ही नकार दिला तरी एकमेकांची बाहेर बदनामी करू नका

👉 जर स्थळ योग्य वाटत असेल , पत्रिका जुळत असेल तर स्वतः फोन करून सांगा , समोरच्याचा फोन येण्याची वाट पाहू नका.

👉 लग्न ठरवण्यासाठी मी का आधी फोन करू असा अहंकार ठेवू नका व स्वतः पुढाकार घेऊन फोन करा.

👉 लग्न ठरवणे ही दोन्ही बाजूच्या लोकांची गरज आहे हे लक्षात ठेवून एकमेकांशी संवाद साधावा व समोरच्याला रिस्पेक्ट व मान द्यावा.

प्रसाद शिवरकर (संचालक – विवाहप्रसाद विवाहसंस्था)

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular




More forecasts: oneweather.org