गोल्डन आय न्यूज नेटवर्क
हटके गीत रामायण : महायज्ञ : पुष्प २ रे : स्थळ – श्रीविष्णूंचे देवस्थान, कोळिसरे, रत्नागिरी, कोकण !
हटके म्युझिक ग्रुप तर्फे गीत रामायण 56 वेळा सादर करण्याचा एक मोठा संकल्प !
,”हटके म्युझिक” या संस्थेच्या ५६ वेळा गीत रामायण सादर करण्याच्या संकल्पातील आणखी एक पुष्प काल सादर करण्याची संधी चालून आली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या “कोळीसरे” या ठिकाणी त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री (१५ नोव्हेंबर् २०२४) लक्ष्मी-केशव मंदिरात, देवासमोर बसून, गायनाच्या माध्यमातून सेवा करण्याच्या मिळालेल्या संधीचे सोने झाले. कोळीसरे या गावी हटके ग्रुपचा गीतरामायणातील निवडक गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला हटके ग्रुपच्या संकल्पित ५६ कार्यक्रमांपैकी हा दुसरा कार्यक्रम होता.
“वैकुंठीचा राणा नारायणा” *******”
कोळीसरे हे गाव तसं थोडं अपरिचितच पण हटके ग्रुपचे या उपक्रमातील सहकारी संगीत संयोजक आणि ध्वनिमुद्रक गायत्री स्टुडिओचे श्री मिलिंद जोशी यांचे ही कुलदैवत. त्यांच्याकडून या स्थानाच महात्म्य सर्वांना कळल्यावर स्वाभाविकच कोळीसरे इथेही आपली गीत रामायणाची गायन सेवा पोहोचावी यासाठी हटकेचे संस्थापक संयोजक श्री शिरीष कुलकर्णी आणि मार्गदर्शक श्री माधव धायगुडे यांच्या प्रयत्नांनी आणि अर्थातच श्री मिलिंद जोशी यांच्या सहकार्याने इथे सेवा देण्याचा विचार करून आम्ही १५ आणि १६ नोव्हेंबरला गणपतीपुळे कोळीसरे आणि परत पुणे अशी एक छोटेखानी सहल करून आलो.
कोकणच्या हिरव्या निसर्गाच्या साक्षीने आणि सर्व सह कलाकारांच्या सोबतीने झालेला हा प्रवास तेथील स्थान दर्शन आणि निसर्ग सान्निध्य या सगळ्यामुळे संस्मरणीय तर झालाच पण प्रत्यक्ष मंदिराचं स्थान महात्म्य त्या जागेचा पावित्र्य, तिथले शाश्वत नैसर्गिक पाण्याचे झरे, या सगळ्यामुळे आम्ही सगळेच अक्षरशः स्तिमित झालो. प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन इतके विलोभनीय की बघतच राहावे….. वैकुंठीचा राणा… हे गाणं….
शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी पहाटे पुण्यातून निघून दुपारी ४ वाजता गणपतीपुळे इथे बाप्पाचं दर्शन घेतलं. भक्तनिवसात ताजेतवाने होऊन कोळीसरे येथील लक्ष्मी-केशव मंदिराकडे प्रस्थान केले.रत्नागिरी पासून साधारणपणे 30-35 किलोमीटर अंतरावर कोळीसरे या गावात एक जुने लक्ष्मी केशव मंदिर एका टेकडीवर वसलेलं आहे या मंदिराला सुमारे बाराशे वर्षांचा इतिहास आहे.
एका आख्यायिकेनुसार मराठवाड्यातील एका कुटुंबामध्ये भगवान विष्णूंची काही भक्तमंडळी होती त्यांनी अनेक सुंदर सुंदर मंदिर बांधली होती. त्या काळात मोगलांपासून आपल्या देव-देवतांना वाचवणे हे मोठंच धार्मिक आव्हान होत.
त्यामुळे मोगलांच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी ही मूर्ती रंकाळा तलावामध्ये पाण्यात विसर्जित करून ज्या देवतेचं संरक्षण करण्यात आलं होतं तीच ही देवता लक्ष्मी केशव…..(गाण्याचं तिसरं आणि शेवटचं कडवं मूर्तीला नेमकं लाल वस्त्र घातलेला आहे म्हणून टाकता येईल असं वाटतं)एका प्रसन्न पवित्र आणि शांत वातावरणातील गाभाऱ्यामध्ये या उभ्या मूर्तीला पाहिल्यानंतर मनाला समाधान तर मिळाले च पण तिच्याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता ही सगळ्यांच्याच मनात निर्माण झाली. त्यासाठी थोडा प्रयत्न केला………
(तर गोष्ट अशी आहे……)
एका देवी साक्षात्कारा नुसार पंधराशे नऊ मध्ये ही श्री लक्ष्मी केशवा ची मूर्ती रंकाळा तलावातून काढली गेली आणि तिची पुनर्स्थापना करण्यासाठी नेत असताना ती काही काळ एका टेकडीवरील स्थानावर ठेवण्यात आले इथेही काहीतरी दैवी संकेत आणि साक्षात्कार मिळाल्यामुळे तिची स्थापना त्याच टेकडीवर म्हणजेच आज मितीस मूर्ती असलेल्या कोळीसरे इथेच करण्यात आली.
२००८ मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार केला गेला.
श्री लक्ष्मी केशवा ची मूर्ती म्हणजे स्थापत्य कलेचा तसे च अप्रतिम कारागिरीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणावा लागेल.
आरती…..जय जय लक्ष्मी केशव स्वामी…….
श्री लक्ष्मी केशवाची ही मूर्ती नितळ तेजस्वी असून त्याची उंची सुमारे पाच फूट आहे आणि त्याच्यासोबत च्या शाळुंखे ची उंची दीड फूट आहे. मूर्तीच्या हातात शंख चक्र गदा पद्म अंगावर निरनिराळे अलंकार शिवाय वैशिष्ट्यपूर्ण असं यज्ञोपवीतही कोरलेल आहे .
आपल्याला भगवंताला सगुण स्वरूपात बघण्याची खूप आवड असते पण हे प्रत्यक्षात उतरणे शक्य नसल्यामुळे आपण हे चित्र कल्पनेने रेखाटतो आणि त्याचं मूर्त रूप बनवल्यानंतर हे कल्पनाचित्र साकार झाल्याचा मनस्वी आनंद आपल्याला मिळतो.
अतिशय देखणी आणि भव्य दिव्य आकर्षक अशीही मूर्ती अखंड शिळेमधून कोरलेली आहे या मूर्तीची रचना तिच्या आयुधांची शस्त्रांची वस्त्रांची तसंच आभूषणाची रचना ही मूर्तीशास्त्राच्या शास्त्रशुद्ध आधाराने विचारपूर्वक कोरलेली दिसतात आणि आजही त्याचा आपल्याला प्रत्यक्ष दर्शनही घेता येत.
श्री विष्णूंच्या सहपरिवार मूर्तीचं संपूर्णपणे निरीक्षण केल्यास एरवी मूर्तीचे आसनस्थान नेहमी कमळ असतं पण इथे अशी ही कमलासनी मूर्ती नसून एका भव्य व्यासपीठावर अर्थातच पाटावर ही चतुर्भुज मूर्ती स्थानापन्न झालेली दिसते.
या चतुर्भुज विष्णू मूर्तीच्या डाव्या हाताखाली लक्ष्मी तर उजव्या हाताखाली गरुड वाहन दिसतं उजव्या हातात अर्धवनमध्ये पद्म तरवरच्या उजव्या हातात दंडयुक्त शंख हेही दिसतात तर डाव्या वर्षा हातात दंडयुक्त चक्र आणि डाव्या खालच्या हातात षटकोनी दंड गदा अशी आयुधही दिसतात.आभूषणांचा विचार करता चक्र मकर कुंडल डोक्यावरील मुकुट त्यावर कळस आणि मुकुटाच्या मागे प्रभावळ कोरलेली आढळते. मूर्तीच्या अंगावरील दागिनेही आपले लक्ष वेधून घेतात यातलं प्रमुख दागिना म्हणजे जिचा एकावली म्हणजेच एकेरी माळ असा उल्लेख केला जातो ती मोठ्या टपोरी मण्यांची एक माळ आढळते.
त्याचबरोबर हेमसूत्र म्हणजेच यज्ञोपवीत आपल्या बोली भाषेतील जानवं हे देखील तितकंच लक्षवेधी आहे. बाजूबंद हातातली कंकण सगळ्या हातांच्या बोटांमधल्या अंगठ्या या सर्व आभूषणांमध्ये मोती रत्न यांचे आकारही लक्षात राहतात. प्रमुख दागिन्यांपैकी मेखला ही तर विशेषच लक्षवेधी आहे मेखला हे आभूषण म्हणजे कमरेभोवती अर्धवट गुंडाळलेले असून त्याला गुडघ्यापर्यंत लांब अशा साखळ्या आणि मण्यांचे सर आढळतात……
मूर्तीचे नखशिखांत दर्शन घेतल्यास निमुळत्या बोटांचे बाहू, डोळे अर्धोन्मिलीत असले तरी एकाग्र दृष्टी आणि प्रसन्न भाव असलेलं श्रीविष्णूंचा मुख कमल आढळतं. विष्णू वाहन गरुडाची ही अर्धासन मूर्ती मानवी रूपात दर्शवली आहे गरुडाचे विशाल काय पंख आणि वळणदार नाक हे आपलं निश्चितच लक्ष वेधून घेतात.या संपूर्ण मूर्तीचे आधारस्थान हे एक पिठासन असलं तरीही मूर्ती स्थानापन्न करताना मूर्तीला स्थिर आधार मिळावा तसंच मूर्तीच्या रक्षणासाठी एका प्रभावालयाची रचना आढळते त्यामुळे मूर्तीला व्यवस्थित आधार देण्याचा हेतूही सिद्धी जातो.
या मंदिराचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या खालून पाण्याचा एक जिवंत झरा वाहत असून तो बाराही महिने अखंड वाहत असतो अनेक तज्ञांनी प्रयत्न करूनही या झऱ्याचं उगमस्थान अद्याप सापडलेले नाही या घराचे पाणी पंचक्रोशीत सर्वत्र वापरलं जातं. जवळच असणाऱ्या पावस क्षेत्रीही स्वामी स्वरूपानंद इथूनच पाणी येत असत असंही बोललं जातं आणि या तीर्थासम पाण्याने व्याधीग्रस्तांनाही आराम मिळतो अशीही भक्तांची भावना आहे.
मूर्तीची दैनंदिन पूजा अर्चा केली जाते. या मंदिरातील वार्षिक उत्सव दरवर्षी कार्तिक शुक्ल दशमी ते कार्तिक पौर्णिमा यादरम्यान साजरा केला जातो. याच उत्सव काळातील शेवटच्या दिवशी दीपोत्सवानंतर आमच्या हटके ग्रुपला गायन सेवेची संधी मिळाली आणि त्याचा पूर्णपणे आम्ही आनंद घेतला.
मंदिरातील सभोवतीची हिरवीगार दाट झाडी आणि या मंदिराच्या खालच्या बाजूला वाहणारा स्वच्छ गोड पाण्याचा झरा ज्याचा “तीर्थ” असाही उल्लेख केला जातो त्या झऱ्यामुळे नैसर्गिक धार्मिक तसेच अध्यात्मिक अशी वेगळीच प्रसन्नता अनुभवायला मिळाली. सगळ्या भक्तांनी जे पुणे मुंबई आणि इतर ठिकाणाहूनही सहपरिवार आले होते त्यांनी केलेलीआकर्षक पारंपारिक सजावट, दिव्यांची रोषणाई रांगोळ्या अतिशय लक्षवेधी होत्या.
विशेष लक्षवेधी होती ती प्रदक्षिणा आणि त्या वेळचे पारंपारिक भजन ,आरत्या.या प्रदक्षिणेच्या वेळी श्री लक्ष्मी केशवाच्या मंदिरा भोवती सर्व भाविक विशिष्ट तालावर ठेका धरून फेर धरतात भजन गातात त्याला “भवत्या”संबोधलं जातं यामध्ये केलं जाणार वाद्य वादन हे छोट्या मुलीही करत होत्या…..
कोळीसरे येथील ग्रामस्थांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.
या प्रदक्षिणा , भजन आरत्या यांचा आनंद घेताना रात्रीचे ११:३० कधी वाजले हे कळलच नाही आणि त्यानंतर आम्हाला गायन सेवेची संधी मिळाली. प्रत्यक्ष श्री लक्ष्मी केशवाच्या मूर्ती समोर, गीतरामायणातील काही निवडक गीतांची गायन सेवा सादर करण्यात आला आनंद आम्हाला मिळाला सगळ्या भक्तांनीही शांतचित्ताने प्रसंगी उत्तम दाद देऊन ही गायन सेवा ऐकली एवढेच नाही तर कार्यक्रम संपतानाच मंदिर व्यवस्थापनाकडून आम्हाला पुढील उत्सवाचं आमंत्रणही मिळालं यातच ही सेवा प्रत्यक्ष भगवंतापर्यंत पोहोचलं याचा समाधान आहे.
रात्री ११:३० वाजता आमचा कार्यक्रम सुरू होऊन संपायला दीड वाजला तरी प्रेक्षकांचा उत्साह तसाच होता. शेवटी न रहावून कार्यक्रम संपला असं जाहीर करावं लागलं. तेव्हा कुठे प्रेक्षकांनी जागा सोडली.