गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पुणे : जागतिक पुस्तक दिनानिमित्त ‘पुस्तकांचे बदलते रूप आणि ग्रंथालयाचे स्थान’ या विषयावर रविवार, दि. 23 एप्रिल रोजी परिसंवाद आणि खुल्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे नगर वाचन मंदिर, कथा बाय स्नेहल बाकरे व झंकार पब्लिशिंग स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ब्लॉक ते ब्लॉग’ या अभिनव उपक्रमाअंतर्गत परिसंवाद आणि चर्चासत्र.
पुणे नगर वाचन मंदिर, 181, लक्ष्मी रोड, तुळशीबाग, बुधवार पेठ येथे सकाळी 10:30 वाजता आयोजित करण्यात आले आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, स्टोरिटेलचे प्रसाद मिरासदार, मृणालिनी वनारसे, सुवर्णा जोगळेकर, संगीता पुराणिक आणि शिल्पा देशपांडे यांचा कार्यक्रमात सहभाग असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात
जाहिरात –