गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पुणे : रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिला जाणारा मानाचा काव्य जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ कवी, लेखक प्रा. विश्वास वसेकर यांना जाहीर करण्यात आला असून पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. 16 एप्रिल 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
प्रा. विश्वास वसेकर
कार्यक्रम सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे होणार असून पुरस्कार वितरण माजी परराष्ट्र सचिव व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते होणार आहे.
ज्येष्ठ संशोधक डॉ. अविनाश अवलगांवकर आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे दिली.
यापूर्वी काव्य जीवन गौरव पुरस्काराने सरिता पत्की, डॉ. विठ्ठल वाघ, रमण रणदिवे, हेमा लेले, अरुण म्हात्रे, डॉ. अश्विनी धोंगडे, आसावरी काकडे, बण्डा जोशी, प्रभा सोनवणे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
———————————————-
जाहिरात – Click on Image