गोल्डन आय न्यूज नेटवर्क
भाजपा सांस्कृतिक आघाडी तर्फे घेतलेल्या आम्ही सारे सावरकर कार्यक्रमात प्रिया बेर्डे , मुरलीधर मोहोळ , डॉ संजय चोरडिया यांची उपस्थिती.
स्वातंत्रवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना सावरकरांवरील सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे उत्तर – प्रिया बेर्डे
पुणे – भाजपा सांस्कृतिक आघाडी तर्फे प्रिया बेर्डे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सारे सावरकर हा कार्यक्रम पुण्यातील स्वा. सावरकर स्मारक येथे घेण्यात आला.
कार्यक्रमाला भाजपा सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष प्रिया बेर्डे , पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ , सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे डॉ संजय चोरडिया , नरेंद्र आमले , अमर गवळी , केदार सोमण , अभिनेते गिरीष परदेशी , वेदांग महाजन , कुणाल शहा , अभिषेक अवचट , माधुरी जोशी अवचट , धनंजय वाठारकर , विद्या पोकळे , वकुल पराडकर , रवी ढमाले तसेच भाजपा सांंस्कृतिक आघाडीचेे सभासद व इतर नागरीक उपस्थित होते.
सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना सावरकरांच्या कविता व गीते अशा सांस्कृतिक कार्यक्रमातून सडेतोड उत्तर दिल्याचे प्रिया बेर्डे यांनी सांगितले.
ह्या प्रसंगी जन्मदा संस्थेचे अजय पराड व इतर कलाकारांनी सावरकरांवर कविता , किस्से व गाण्याचा कार्यक्रम सादर केला.
कार्यक्रमाचे निवेदन जतीन पांडे यांनी केले.
जाहिरात – Click on Image for more details.
जाहिरात
जाहिरात