रोटरी युथ एक्सचेंज डिस्ट्रिक्ट 3131 च्या वतीने तरुणांच्या माहितीसाठी मोफत सेमिनारचे रविवारी 2 एप्रिल रोजी पिंपरी येथे आयोजन.
पुणे – रोटरी युथ एक्सचेंज डिस्ट्रिक्ट 3131 च्या वतीने रविवारी 2 एप्रिल रोजी पिंपरी येथील रोटरी कम्युनिटी सेंटर येथे सायंकाळी 4 ते 7 वाजता युवकांना रोटरी युथ एक्सचेंज उपक्रमाची माहिती देण्यासाठी मोफत सेमिनारचे आयोजन केले आहे
यात माजी प्रांतपाल रश्मी कुलकर्णी रोटरी युथ एक्सचेंज 23-24 चे डायरेक्टर दीपक बोधनी व अन्य मान्यवर युवकांना या कार्यक्रमाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.
जागतिक तरुण वर्गासाठी रोटरीने रोटरी युथ एक्सचेंज प्रोग्रॅम या उपक्रमाअंतर युवकांसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे.
हा सांस्कृतिक देवाण-घेवाणीचा कार्यक्रम दोन देशांमध्ये राबविला जातो आणि हा कार्यक्रम 15 ते 19 वयोगट असणाऱ्या मुलामुलींसाठी खुला आहे.
या कार्यक्रमाची अधिक माहिती , आर्थिक अटी किंवा उलाढाली काय आहेत तसेच कोण सहभागी होऊ शकते आणि केव्हा होऊ शकते या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि तज्ञांचे मार्गदर्शन या कार्यक्रमात दिले जाणार आहे.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे नाव नोंदणीसाठी लिंक पुढील प्रमाणे
http://forms.gle/cQtab6DFzGFdQUh7
नाव नोंदणी व इतर माहितीसाठी रोटेरियन अंकुश पारख 99 23 10 21 17 यांना संपर्क साधावा. तसेच या वेबसाईटवर
माहिती मिळेल
जाहिरात – Click on image for more details.
जाहिरात – Click for more details.