(वृत्तसंकलनःआत्माराम ढेकळे,पुणे)
बबन पोतदार लिखित “मुक्ता” कथेवर एकांकिका
पुणेः- येथील निवृत्त आयकर अधिकारी, प्रामुख्याने ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक म्हणून समाजात सर्व परिचित आहेत. ब.ल.पोतदार तसेच बबन पोतदार म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. विविध वृत्तपत्रामधुन ते स्तंभलेखन करतात.
आकाशवाणी पुणे, मुंबई, सांगली केंद्रावर त्यांच्या अनेक कौटंबिक श्रुतिका प्रसारित झाल्या आहेत. त्याचप्रमाणे मुंबई दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुनही त्यांचे अनेक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. त्यांचे प्रकाशित साहित्य व कथासंग्रह मोठया प्रमाणात आहे. त्यामध्ये गुंजेचा पाला, आक्रित, एका सत्याचा प्रवास हे कथासंग्रह तसेच त्यांच्या मुक्ता कथेवर आधारित गुंतले ह्रदय माझे या मराठी चित्रपटही निघाला आहे.
त्यांच्या ‘आक्रित’ या कथासंग्रहातील “मुक्ता” याच कथेवर आधारित पुणे येथील नुप्रिहा क्रिएशन्स या ख्यातनाम ग्रुपतर्फे ‘मुक्ता ‘ या शिर्षकांतर्गत एकांकिका लवकरच सादर होणार आहे.
या मुक्ता कथेचे लेखन बबन पोतदार असुन नाट्य रुपांतर धनंजय खाडिलकर व अनघा गपचूप यांनी केले आहे. दिग्दर्शन धनंजय खाडिलकर यांचेच आहे.
प्रस्तुत एकांकिकेमध्ये प्रामुख्याने धनंजय खाडिलकर, अनघा गपचूप, स्मिता जोशी, आरती गुप्ते व नुपूर खाडिलकर यांच्या भुमिका आहेत. साहित्यिक पोतदार यांच्या कथासंग्रहातील कथेवर आधारित सादरीकरण होणार असल्याबद्दल त्यांचे अनेक चाहते, मित्रवर्ग, आप्तेष्ट यांनी शुभेच्छा व्यक्त करुन अभिनंदन केले आहे.
*****************************
Advertise