अभिनेत्री सुलेखा तळवलकर घेऊन येत आहेत ‘सुलेखा तळवलकर शो’ – एक वेगळा आणि दर्जेदार पॉडकास्ट अनुभव
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सुलेखा तळवलकर आता प्रेक्षकांसाठी एका नव्या आणि आगळ्यावेगळ्या रूपात भेटीला येत आहेत. त्यांच्या नव्या YouTube चॅनेल – “Sulekha Talwalkar Show” च्या माध्यमातून त्या विविध क्षेत्रांतील मान्यवर, तज्ज्ञ आणि सेलिब्रिटींसोबत अर्थपूर्ण, मनमोकळे आणि प्रेरणादायी संवाद प्रेक्षकांपर्यंत घेऊन येणार आहेत.
“Sulekha Talwalkar Show” ची सुरुवात 5 सप्टेंबर 2026 रोजी होत असून, प्रत्येक शनिवारी संध्याकाळी 7.30 वाजता या चॅनेलवर नवा भाग प्रसारित होणार आहे.
या शोमध्ये केवळ मुलाखती नसतील, तर प्रत्येक भागात अनुभव, विचार, प्रेरणा आणि जीवनाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन प्रेक्षकांना मिळणार आहे.
शोमध्ये विविध विषयांवर आधारित पॉडकास्ट्स पाहायला मिळतील. त्यामध्ये –
– लोकप्रिय कलाकार आणि कलाकार जोड्यांच्या लग्नाच्या आठवणी, नातेसंबंध आणि त्यांच्या आयुष्यातील रंजक किस्से.
– कलाकारांसोबत त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील पडद्यामागच्या गोष्टी आणि अनुभव.
– यशस्वी उद्योजकांसोबत व्यवसाय, नेतृत्व आणि यशाचा प्रवास.
– वास्तुशास्त्र आणि ज्योतिष विषयातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन.
– अध्यात्म, आरोग्य, सौंदर्य, जीवनशैली आणि ‘खाना खजाना’ यांसारख्या विषयांवरील विशेष संवाद.
– तसेच समाजातील बदलते प्रवाह, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे आणि अनेक वेगवेगळे विषय.
प्रत्येक भागामध्ये एक नवीन व्यक्तिमत्त्व, नवीन अनुभव आणि प्रेक्षकांना समृद्ध करणारा संवाद अनुभवायला मिळणार आहे.
या नव्या उपक्रमाबद्दल सुलेखा तळवलकर म्हणतात,
“माझ्या ‘दिल के करीब’ या YouTube चॅनेलला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. त्यासाठी मी मनापासून आभारी आहे. आता मी अजून एक अतिशय वेगळा उपक्रम घेऊन येत आहे. प्रेक्षकांशी अजून चांगल्या प्रकारे संवाद ठेवण्यासाठी आणि अधिक दर्जेदार व विविध विषयांवरील पॉडकास्ट्स घेऊन येण्यासाठी ‘Sulekha Talwalkar Show’ हा वेगळा YouTube चॅनेल सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक भागामधून प्रेक्षकांना काहीतरी नवीन, प्रेरणादायी आणि विचार करायला लावणारं नक्कीच मिळेल, असा मला विश्वास आहे.”
“Sulekha Talwalkar Show” हा केवळ मनोरंजनाचा मंच नसून, विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींशी संवाद साधत ज्ञान, प्रेरणा आणि अनुभवांची देवाणघेवाण घडवून आणणारा एक समृद्ध पॉडकास्ट प्लॅटफॉर्म ठरणार आहे.
5 सप्टेंबर 2026 पासून, प्रत्येक शनिवारी संध्याकाळी 7.30 वाजता, “Sulekha Talwalkar Show” या YouTube चॅनेलवर हा विशेष पॉडकास्ट पाहायला विसरू नका.
Like करा, Subscribe करा आणि या नव्या प्रेरणादायी प्रवासाचा भाग बना!











