Marathi FM Radio
Saturday, June 27, 2026

सुलेखा तळवलकरांनी गाजविलेल्या विठाबाईच्या भूमिकेमध्ये आता श्रद्धा कपूर करणार काम “Eetha “ईठा नावाच्या हिंदी सिनेमांमध्ये !

Subscribe Button

गोल्डन आय न्यूज नेटवर्क

Advertisement

बॉलीवूड मध्ये सध्या श्रद्धा कपूरच्या “ईठा “या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे .प्रसिद्ध तमाशा सम्राट्नी  विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचा दमदार टिझर प्रसिद्ध झाला आणि तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटासाठीची आतुरता आहे .

Advertisement

पण तुम्हाला माहिती आहे का बॉलिवूडमध्ये हा चित्रपट येण्याआधी विठाबाईंच्या आयुष्यावर मराठीमध्ये एक लघुपट आला होता.

Advertisement

Advertisement

यामध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीने विठाबाईंची भूमिका साकारली आहे .अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांनी विठाबाईंची भूमिका साकारली होती .अविष्कार भारद्वाज यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते  .अगदी  लहानपणापासून  विठाबाईंच्या वाट्याला आलेला संघर्ष या लघुपटामध्ये आहे. 100 पेक्षा जास्त पुरस्कार या शॉर्ट फिल्म ने पटकावले  आहेत .सुलेखा तळवलकर यांनी विठाबाईंची भूमिका खूप सक्षमपणे साकारली आहे.अंगावर काटा आणणारे अनेक सीन आहेत.

Advertisement

विठाबाई नारायणगावकर यांची कथा 1964 सालचे एका प्रयोगादरम्यान प्रसूती कळा सुरू झाल्याने त्यांनी पडद्यामागे जाऊन बाळाला जन्म दिला .आणि तसेच स्टेजवर येऊन त्यांनी कार्यक्रम गाजवलाय कले प्रति असलेल्या निष्ठेसाठी विठाबाई नारायणगावकर हे नाव आजही लक्षात राहतं .

आता  “ईठा “या चित्रपटातून त्यांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर येणार आहे .तर सुलेखा तळवलकर यांना विठाबाई नारायणगावकर यांच्या भूमिकेत तुम्ही पाहिलय का .

 

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular