गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘किराना परंपरा’ : विशेष कार्यक्रम मालिका : सत्र दुसरे
उस्ताद अब्दुल करीम खान साहेबांचे उपशास्त्रीय व सुगम संगीत
डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशन संचालित स्वरमयी गुरुकुलचे आयोजन
पुणे : हिंदुस्थानी खयाल गायकीच्या संदर्भात किराना घराण्याची परंपरा देदीप्यमान आहे. किराणा घराण्याच्या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांचे कार्यकर्तुत्व उलगडून दाखवणारी ‘किराना परंपरा’ ही विशेष कार्यक्रम मालिका डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशन संचालित स्वरमयी गुरुकुलातर्फे सुरू करण्यात आली आहे.
स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या संकल्पनेतील या विशेष मालिकेतील दुसरे सत्र रविवार, दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी होत असल्याची माहिती डॉ. प्रभा अत्रे फांडेशनचे कार्यक्रम दिग्दर्शक प्रसाद भडसावळे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
डॉ. केशवचैतन्य कुंटे आणि डॉ. अतींद्र सरवडीकर हे कार्यक्रमाची प्रस्तुती करणार आहेत. कार्यक्रमात रसिकांना व संगीत अभ्यासकांना मुक्त प्रवेश आहे.











