गोल्डन आय न्यूज नेटवर्क
नू. म. वि.तील विद्यार्थ्यांना आग विझविण्याचे प्रशिक्षण
साईनाथ मंडळ ट्रस्टचा सेवाभावी उपक्रम !!
पुणे : राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहानिमित साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे बाजीराव रस्त्यावरील नूतन मराठी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयामधील 300 विद्यार्थ्यांना आज (दि. १९) आग विझविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहानिमित अग्निशमन विभागातर्फे विविध उपक्रब राबविण्यात येत आहेत. आग कशामुळे लागू शकते, आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास काय-काय उपाययोजना कराव्यात या विषयी कसबा अग्निशमन केंद्रातील प्रभारी अधिकारी कमलेश चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आग विझविण्यासाठी अग्निशमन वाहनात असलेल्या विविध उपकरणांची माहितीही देण्यात आली तसेच या उपकरणांचा वापर कशा पद्धतीने केला जातो याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. आग विझविण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थी आणि शिक्षकांकडून करून घेण्यात आले.
उपक्रमास शाला समितीचे अध्यक्ष पराग ठाकूर याचे सहकार्य लाभले असून डी. बी. देवरुखकर यांच्या सौजन्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अग्निशमन वाहनामधील अधिकारी कमलेश चौधरी, चालक किरण शिंदे, फायरमन अब्दुल पटेल, हरीश बुंदेले, ज्ञानेश्वर गायकवाड व आतिश नाईकनवरे यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे आयोजन साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे अध्यक्ष पियूष शहा यांनी केले. शहा यांचा हस्ते अग्निशमन दलातील जवानांना मानचिन्ह व स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. पियूष शहा यांनी प्रास्ताविकात अग्निशामन दलातील जवानांच्या कार्याविषयी माहिती देत आभार मानले.
महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश कांबळे, उपप्राचार्या राजश्री हेंद्रे, उषा जांभळे, भारती कपटकर, माधुरी भामरे, बाजीराव शेरमाळे, विद्या चाकणकर आदी उपस्थित होते. रविवार दि. 20 रोजी नटरंग डान्स अकॅडमीमधील 200 विद्यार्थ्यांकरता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.