गोल्डन आय न्यूज नेटवर्क
आडकर फौंडेशनतर्फे शुक्रवारी सुहास उडुपीकर यांचा सन्मान !
निमित्त न्यू पूना बोर्डिंग हाऊसच्या शंभरीचे..
पुणे : उत्कृष्ट खाद्यसेवा पुरविणाऱ्या न्यू पूना बोर्डिंग हाऊसला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याचे निमित्त साधून आडकर फौंडेशनतर्फे भोजनालयाचे संचालक सुहास उडुपीकर यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
कार्यक्रम शुक्रवार, दि. 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
सत्कार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते होणार असून महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
l
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘आपण सारे खवय्ये’ या विषयावर कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात स्वप्नील पोरे, सुजित कदम, शोभा शेट्टीवार, मीना सातपुते, उज्ज्वला सहाणे, डॉ. रेवा देशमुख, राजश्री सोले, हेमंत केतकर, स्वाती दाढे, प्रतिभा पवार, मीनाक्षी नवले, प्रभा सोनवणे, प्रतिमा जोशी, शैलजा किंकर यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.











