गोल्डन आय न्यूज नेटवर्क
चिनके -खराडकर परिवारातील साखरपुडा उत्स्फुर्त प्रतिसादात उत्साहात संपन्न !!
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) येथील एम.आर.चिनके ज्वेलर्स गोल्डस्मिथ चे संचालक सुधीर मधुकरराव चिनके व सौ.सुलभा सुधीर चिनके यांचे सुपूत्र *चि. दिपेश* यांचा साखरपुडा (साक्षगंध) कन्नड निवासी प्रसिध्द सराफा व्यावसायिक अनिलराव बबनराव खराडकर व सौ.उर्मिला अनिलराव खराडकर यांची सुकन्या चि.कु. *ज्ञानेश्वरी* हिच्यासी छत्रपती संभाजीनगर येथे दि.३१जुलै २०२५ रोजी मोठ्या उत्साहात विविध ठिकाणाहून आलेल्या निमंत्रित मान्यवर अतिथी,नातेवाईक यांच्या उपस्थितीत उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न झाला.
छत्रपती संभाजीनगर येथील सेवन हिल भागातील ‘अतिथी हाॕल ‘ येथे चिनके -खराडकर परिवारातील साखरपुडा (साक्षगंध)सोहळा आयोजित केला होता.रुढी ,परंपरागत असलेल्या विधीनुसार पुरोहित गणेश पोखारे गुरुजी यांनी पुजन विधीच्या मंत्रोच्चारात सर्व विधी पुर्ण केल्या.यानंतर सुवासिनी माहिलांनी ओटी,औक्षण केले .भेटीगाठी झाल्या .या साक्षगंध सोहळ्यातील होणारे वर -वधु (‘वरातीत आणि वधूसुने ) दिपेश व ज्ञानेश्वरी यांचा एकमेकांना अंगठी (रिंग सिरोमनी )घालण्याच्या कार्यक्रमाचे आगळे -वेगळे आकर्षण लक्षवेधी ठरले.
यानंतर केक कटींगही करण्यात आला.अनेकांनी त्यांना या प्रसंगी शुभेच्छा व आशिर्वाद दिले.या साखरपुडा सोहळ्याचे मनमोहक शैलीतुन पत्रकार आत्माराम ढेकळे यांनी सुत्रसंचलन केले.प्रामुख्याने साखरपुडा /साक्षगंधचे महत्व व माहिती निवेदनातुन दिली.
या सोहळ्यास प्रामुख्याने स्थानिक तसेच बाहेरगावाहुन निमंत्रित मान्यवर ,महिला-पुरुष,ज्येष्ठ व्यक्ती पाहुणे,नातेवाईक,व्यापारी ,सुवर्णकार विविध शाखेतील समाज बांधव,संस्था -संघटनेचे पदाधिकारी, कारागीर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यामध्ये प्रामुख्याने सचिन खैरे साहेब,सुरेश नाना मेखे ,पोलखोल टाईम्सचे संपादक भगवान शहाणे ,श्रीधरशेठ डहाळे ,सुभाष उदावंत ,चंद्रकांत जोजारे ,सुनीलशेठ पिंप्रीकर ,कृष्णाशेठ झव्हेरी ,राजुशेठ जडगाववाला , सुनीलशेठ गोलटगावकर ,सोपानशेठ मुंडलीक ,रामुशेठ दोडियाजी,संजयजी शहाणे आदी मान्यवर व्यक्तींचा समावेश होता.
सोहळ्यातील भोजनाचा आस्वादही सर्वांनी घेतशृला,चिनके परिवार व खराडकर परिवार च्या आग्रहाच्चा निमंत्रणाचा स्नेह व आपुलकीने स्विकार करुन शेवटपर्यंत या साखरपुडा समारंभात सर्वांनी उपस्थिती दर्शविली.याबद्दल समाधान व्यक्त करुन आयोजकांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.