गोल्डन आय न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रीय कलोपासक
कार्यक्रमाचे निमंत्रण/प्रसिद्धीसाठी
प्रति,
मा. संपादक
महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे ‘कलोपासकांचे आख्यान’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार, दि. 9 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते होणार आहे.
या प्रसंगी महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस राजेंद्र ठाकूरदेसाई यांच्या मुलाखातीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी आपल्या वृत्तपत्र/वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधी-छायाचित्रकार यांची उपस्थिती प्रार्थनिय आहे.