गोल्डन आय न्यूज नेटवर्क
गाथा जाधव-आयगोळे यांना स्व. दीपक करंदीकर स्मृती गझल पुरस्कार
रंगत-संगत, करम प्रतिष्ठानतर्फे रविवारी गौरव !!
पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठान व करम प्रतिष्ठानर्फे स्व. दीपक करंदरीकर स्मृती गझल पुरस्काराने गझलकारा गाथा जाधव-आयगोळे (कल्याण) यांना गौरविले जाणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. प्रज्ञा महाजन, मैथिली आडकर, वासंती वैद्य, प्राजक्ता वेदपाठक, ऋचा कर्वे संयोजन करीत आहेत.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त निमंत्रितांचे गझल संमेलन आयोजित करण्यात आले असून यात भूषण कटककर, प्राजक्ता पटधर्वन, प्रभा सोनवणे, अजय जोशी, स्वाती यादव, चैतन्य कुलकर्णी, रेखा कुलकर्णी, शीला टाकळकर, कविता क्षीरसागर, चंचल काळे, अमिता पैठणकर, डॉ. मृदुला कुलकर्णी-खैरनार यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.