गोल्डन आय न्यूज नेटवर्क
गायन, वादनाची ‘संगीत संध्या’ मैफल शनिवारी !!
पुणे : इंडियन मेडिकल असोसिएशन, आय. एम. ए. आर्ट सर्कल व कलासक्त कल्चरल फाऊंडेशनतर्फे शनिवार, दि. २६ जुलै रोजी ‘संगीत संध्या’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात डॉ. प्रांजल पंडित यांचे एकल तबलावादन होणार असून मृण्मयी भिडे यांचे शास्त्रीय-उपशास्त्रीय गायन होणार आहे. कलाकारांना सारंग जोशी, चिंतामणी वारणकर साथसंगत करणार आहेत.
कार्यक्रम सायंकाळी ५:३० वाजता डॉ. के. एच. संचेती सभागृह, डॉ. नितू मांडके आय. एम. ए. हाऊस, टिळक रोड येथे होणार आहे, अशी माहिती आय. एम. ए.चे अध्यक्ष डॉ. सुनिल इंगळे, आर्ट सर्कलचे अध्यक्ष डॉ. मोहन जोशी, कलासक्त कल्चरल फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीरंग कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.