गोल्डन आय न्यूज नेटवर्क
स्वरमयी गुरुकुलतर्फे रविवारी बासरीवादन-गायन जुगलबंदी.!!
पुणे : डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचलित स्वरमयी गुरुकुलतर्फे मासिक स्वरमयी बैठकीअंतर्गत बासरीवादन आणि गायन जुगलबंदीचे आयोजन करण्यात आले आहे.
मैफल रविवार, दि. 20 जुलै रोजी सकाळी 10 वाजता स्वरमयी गुरुकुल सभागृह, संभाजी उद्यानासमोर, शिवाजीनग र येथे आयोजित करण्यात आली आहे.
मैफलीत पंडित सुदिप चट्टोपाध्याय यांचे बासरीवादन तर विदुषी मधुमिता चट्टोपाध्याय यांचे उपशास्त्रीय गायन होणार आहे. किशोर कोरडे (तबला) आणि उमेश पुरोहित (संवादिनी) साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
पंडित सुदिप चट्टोपाध्याय हे पन्नालाल घोष घराण्याचे प्रतिनिधीत्व करणारे ज्येष्ठ बादरीवादक असून देश-परदेशातील अनेक संगीत महोत्सवात त्यांचे बासरीवादन झाले आहे.
शास्त्रीय, उपशास्त्रीय गायनात प्रभुत्व असलेल्या मधुमिता चट्टोपाध्याय यांनी भारतातील अनेक सांगीतिक कार्यक्रमात हजेरी लावली आहे.