गोल्डन आय न्यूज नेटवर्क
संयुक्त प्रसाद मित्र मंडळ, नारायण पेठ, पुणे
ग्रामीण भागातील 3 शाळांना झेरॉक्स मशीन भेट आणि १००० वारकरी भक्तांना भोजन सेवा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील शिरूर, पुरंदर आणि फुरसुंगी येथील दुर्गम भागातील ३ शाळांना विनोद Enterprises च्या सहकार्याने Multipurpose झेरॉक्स मशीन देण्यात आले.
विनोद Enterprises हे शार्प इलेक्ट्रॉनिक्स चे पुणे जिल्हा वितरक आहेत. यावेळी बोलताना आमदार हेमंत रासने म्हणाले की व्यवसाय करताना सामाजिक भान जपणारे विनोद सांखला यांचे काम कौतुकास्पद आहे. यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना फायदा मिळणार आहे. या वेळी यवतमाळ जिल्ह्यातील आदिनाथ दिंडी प्रमुख सुरेश महाराज यांनी संयुक्त प्रसाद मित्र मंडळाच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.
यावेळी दिंडी प्रमुख पुरुषोत्तम महाराज, नगरसेवक राजेश दादा येनपुरे, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोतीबाग नगर कार्यवाह माननीय प्रमोद जी वसगडेकर, बारामती सेवा कार्य प्रमुख श्री. अजय जी पुरंदरे, गरवारे कॉलेजचे मुख्याध्यापक प्रा. रविंद्र जी वैद्य, भाजपा कसबा मंडल अध्यक्ष अमित जी कंक, उपाध्यक्ष निलेश जी कदम, संकेत जी थोपटे उपस्थित होते.
यावेळी संघ परिवारातील फुरसुंगी येथील श्री सदगुरू शिक्षण संस्थेची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळा, तसेच शिरूर तालुक्यातील समता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सौ. हिराबाई गोपाळराव गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासारी आणि जेजुरी येथील सुशीलगंगा शिक्षण संस्था संचलित भास्कराचार्य इंग्लिश मीडियम स्कूल यांना झेरॉक्स मशीन भेट देण्यात आली. यावेळी शिक्षण संस्था पदाधिकारी सर्वश्री डॉ. राजेंद्र ढमढेरे सर, दीपक महामुनी सर, तन्मय विजय जगताप सर यांचा आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच
संयुक्त प्रसाद मित्र मंडळातर्फे यवतमाळ जिल्ह्यात आदिनाथ दिंडी मधील १००० वारकरी भक्तांकरिता पक्वान्न भोजनसेवा देण्यात आली. सर्व देणगीदारांचे मनापासून आभार
आपले बंधुवत
कार्यकारिणी
संयुक्त प्रसाद मित्र मंडळ