गोल्डन आय न्यूज नेटवर्क
करम प्रतिष्ठानचा सुप्रियास्मृती करमज्योत पुरस्कार निर्मिती कोलते यांना जाहीर !
रविवारी पुरस्कार वितरण सोहळा !!
पुणे : करम प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सुप्रियास्मृती करमज्योत पुरस्कार गझलकारा निर्मिती कोलते यांना जाहीर करण्यात आला असून पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. 24 मार्च रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भूषण कटककर, प्रज्ञा महाजन यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
निर्मिती कोलते
कार्यक्रम सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला, नवी पेठ येथे होणार आहे. पुरस्काराचे वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पुरुष गझल संमेलन होणार असून यात प्रमोद खराडे, शांताराम खामकर, मिलिंद छत्रे, शुभानन चिंचकर, डॉ. मंदार खरे, शंतनू पुराणिक यांचा तर महिला गझल संमेलनात प्राजक्ता पटवर्धन, ज्योत्स्ना चांदगुडे, निर्मिती कोलते, स्वाती यादव, सुजाता पवार, वैशाली माळी, अमिता पैठणकर यांचा सहभाग असणार आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात