गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘कवी शब्दांचे ईश्वर’मधून उलगडणार ना. धों. महानोर यांच्या काव्यांचे पैलू !!
पुणे : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रानकवी ना. धों. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गायन आणि काव्य वाचनावर आधारित ‘कवी शब्दांचे ईश्वर’ या कार्यक्रमाचे मंगळवारी (दि. 12) आयोजन करण्यात आले आहे.
आर्या कम्युनिकेशन अँड व्हिडीओज आयोजित कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांची संहिता असून डॉ. राधा मंगेशकर आणि मनिषा निश्चल गीत गायन करणार आहेत.
तर ‘अनन्वय’ या संस्थेचे यशस्वी कलाकार राहुल घोरपडे, सक्षम कुलकर्णी, नीता कुलकर्णी, अक्षय वाटवे काव्यवाचन करणार आहेत. अमृता ठाकुरदेसाई, प्रणव कुलकर्णी, विशाल गंड्रतवार, अभय इंगळे साथसंगत करणार आहेत.
गीत, काव्य आणि निवेदनाद्वारे ना. धों. महानोर यांच्या काव्यांचे पैलू उलगडले जाणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
——————————————————————–
जाहिरात