गोल्डन आय न्यूज नेटवर्क
Pune : या वर्षीच्या पालखी सोहळ्यात , श्रीमंत पेशवे गणेश मंदिर आणि श्रीमंत पेशवे गणेश प्रतिष्ठान तर्फे संत ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेव महाराज भेटीचा जिवंत देखावा जिजामाता चौकात सादर करण्यात आला. तसेच येणाऱ्या वारकरी भक्तांसाठी चहा व बिस्किट वाटप करण्यात आले.
यावेळी पुण्यातील पहिले महिला लेझीम पथक ‘ तेजस्विनी ‘ नाद संस्कृतीचा'( वडगांव शेरी ) या पथकाने पारंपारिक लेझीम नृत्य सादर केले..!
या दोन्ही सादरी करणाराला वारकऱ्यांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.