Marathi FM Radio
Friday, December 5, 2025

श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दोन दिवसीय सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन !!

Subscribe Button

गोल्डन आय न्यूज नेटवर्क

Advertisement

श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त
दोन दिवसीय सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन !!

युवा, ज्येष्ठ कलाकारांना ऐकण्याची संधी

पुणे : ‌‘माझे विद्यार्थी हेच माझा बँक बॅलन्स‌’ असे म्हणणारे विद्यार्थीप्रिय शिक्षक, समाजधुरीण प्रा. श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दोन दिवसीय विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात युवा कलाकारांसह ज्येष्ठ कलाकारांना ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

Advertisement


कार्यक्रम शनिवार, दि. 21 रोजी सायंकाळी 5:30 वाजता आणि रविवार, दि. 22 जून रोजी सकाळी 9 आणि सायंकाळी 5:30 या वेळात पुण्याई सभागृह, पौड रोड, कोथरूड येथे आयोजित करण्यात आला आहे.
शनिवारी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी आणि पंडित विनायक तोरवी यांचे शिष्य सिद्धार्थ बेलामनू यांचे गायन होणार आहे. त्यापूर्वी प्रा. श्रीराम पुजारी यांच्या जीवनप्रवासावर आधारित चित्रफित दाखविली जाणार आहे.

Advertisement

Advertisement

रविवारी सकाळी 9 वाजता सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक पद्मभूषण एन. राजम्‌‍ यांची नात रागिणी शंकर यांचे व्हायोलिन वादन तर विख्यात गायक पंडित कुमार गंधर्व यांचे नातू भुवनेश कोमकली यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. सायंकाळी प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित व्यंकटेश कुमार यांच्या गायनाने दोन दिवसीय सांगीतिक कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

Advertisement


कलाकारांना भरत कामत, प्रणव गुरव, तनय रेगे, आशय कुलकर्णी, अभिजित बारटक्के (तबला), सुयोग कुंडलकर, मिलिंद कुलकर्णी, अविनाश दिघे (संवादिनी) साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रकाश जोशी, सचिव ललिता दातार यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

 

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular