गोल्डन आय न्यूज नेटवर्क
रंगत-संगत प्रतिष्ठानच्या उद्धव कानडे स्मृती पुरस्काराची घोषणा !!
शिल्पा देशपांडे यांचा बुधवारी होणार गौरव !!
पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे पहिल्या उद्धव कानडे स्मृती पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून पहिला पुरस्कार प्रसिद्ध निवेदिका शिल्पा देशपांडे यांना जाहीर करण्यात आला आहे.
शिल्पा देशपांडे
प्रसिद्ध कवी, लेखक, निवेदक उद्धव कानडे यांच्या स्मृती चिरंतन रहाव्यात या निस्सीम भावनेने निवेदन क्षेत्रातील ज्येष्ठ तसेच उदयोन्मुख निवेदकांचा रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.
पहिल्या पुरस्कारासाठी शिल्पा देशपांडे यांची निवड करण्यात आली असून पुरस्कार वितरण सोहळा बुधवार, दि. 20 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला येथे आयेजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे.
महाराष्ट्र साहित्य प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन इटकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उद्धव कानडे यांची चिंतनशील कविता-समतेचा ध्वज या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून यात ॲड. प्रमोद आडकर, डॉ. ज्योती रहाळकर, बंडा जोशी, दयानंद घोटकर, प्रभा सोनवणे यांचा सहभाग असणार आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
————————————————————
जाहिरात