गोल्डन आय न्यूज नेटवर्क
रंगत-संगत प्रतिष्ठानचा काव्य प्रतिभा पुरस्कार तनुजा चव्हाण यांना जाहीर !!
पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘काव्य प्रतिभा पुरस्कारा’साठी राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध कवयित्री तनुजा चव्हाण यांची निवड करण्यात आली असून पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. 10 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
तनुजा चव्हाण
कार्यक्रम सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला, नवी पेठ येथे होणार असून पुरस्कराचे वितरण ज्येष्ठ विचारवंत, महाराष्ट्र राज्य विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पुरस्कराचे स्वरूप सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व ग्रंथ असे आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निमंत्रितांचे कविसंमेलन होणार असून त्यात प्रमोद खराडे, सुनीती लिमये, मृणालिनी कानिटकर-जोशी, योगिनी जोशी, स्वाती यादव, सुजाता पवार, धनंजय तडवळकर, स्वप्नील पोरे, राजश्री सोले, विजय सातपुते, अंजली देसाई, आरुषी दाते, डॉ. ज्योती रहाळकर यांचा सहभाग असणार आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात