गोल्डन आय न्यूज नेटवर्क
भारत मातेला वंदन करीत राष्ट्रपुरुषांच्या जयघोषात उत्साहात निघाली सावरकर दौड !!
सावरकर आत्मार्पण दिन सप्ताहाच्या प्रारंभानिमित्त स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचा उपक्रम !!
पुणे : ‘भारत माता की जय’, ‘जय श्रीराम’, ‘वंदे मातरम्’, ‘छत्रपती शिवाजी महराज की जय’ आणि ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा विजय असो’ अशा घोषणांनी निगडी परिसर दणाणून गेला. निमित्त होते स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिन सप्ताहाच्या प्रारंभ दिनानिमित्त स्वातंत्र्यवीर समाजिक संस्थेतर्फे आयोजित सावरकर दौडचे!
निगडीतील भक्ती-शक्ती उद्यान येथे सकाळी 8 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर रचित छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती सामूहिकरित्या म्हणण्यात आली. शंखनाद करण्यात आला. मशाली प्रज्वलीत करून सावरकर दौडला प्रारंभ झाला. या वेळी सावरकर घराण्याचे वंशज असिलता सावरकर-राजे, सात्यकी सावरकर, भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, अभिनेते योगेश सोमण, लेखिका व सावरकर अभ्यासक डॉ. शुभा साठे, चित्रपट निर्माते दिग्पाल लांजेकर, अनुप मोरे, तेजस्विनी कदम, राजू मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. भक्ती-शक्ती उद्यान येथे जगत्गुरू संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर दौड सुरू झाली.
स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिन सप्ताहाच्या प्रारंभ दिनानिमित्त स्वातंत्र्यवीर समाजिक संस्थेतर्फे रविवारी सावरकर दौडचे आयोजन करण्यात आले. भक्ती-शक्ती उद्यान येथे सावरकर दौडच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित सात्यकी सावरकर, योगेश सोमण, सुनील देवधर, श्रीनिवास कुलकर्णी आदी.
सावरकर दौडमध्ये ज्ञान प्रबोधिनी, एस. पी. एम., समर्थ विद्यालय, केंब्रिंज तसेच इतर काही शाळांमधील जवळपास 300 विद्यार्थी, शिक्षक आणि पालक तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील असंख्य सावरकर प्रेमी नागरिक पारंपरिक वेषात सहभागी झाले होते. गणेश तलावासमोरील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे सावरकर दौडचा समारोप झाला.
सुरुवातीस स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी सावरकर दौडच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.
सावरकर दौडचा समारोप स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे झाल्यानंतर मराठी आणि संस्कृत भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांना स्वातंत्र्यवीर सावरकर भाषा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सावरकर घराण्याचे वंशज असिलता सावरकर-राजे, सात्यकी सावरकर, भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, आमदार महेश लांडगे, डॉ. शुभा साठे, सरिता साने, अनुप मोरे, धनंजय गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीस श्रीनिवास कुलकर्णी यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. संस्थेच्या कार्यअहवालाचे प्रकाशन या प्रसंगी सुनील देवधर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कालजयी असल्याचे गौरवाने नमूद करून सुनील देवधर म्हणाले, काळ कितीही बदलला तरी सावरकर यांचे विचार अनुकरणीय आहेत आणि सदैव राहतील.
असिलता सावरकर-राजे यांनी स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले. सात्यकी सावरकर म्हणाले, संभ्रमीत समाजाला जशी ज्ञानाची आवश्यकता असते तशीच बलसंवर्धनाचीही आवश्यकता असते. भविष्यातील वाटचाल बलसंवर्धनाच्या आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने झाली तरच समाज टिकून राहिल.
संस्थेची पदनियुक्ती यावेळी जाहीर करण्यात आली.
यात ॲड. श्रीराम जोशी (नांदेड शहराध्यक्ष), हेमदेव थापर (धर्म आणि संस्कृती प्रचारक) यांचा समावेश आहे.
सुरुवातीस मनोरमा प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सावरकरगीत सादर केले. मान्यवरांचा सत्कार डॉ. सचिन बोधनी, निशिगंधा आठल्ये, विक्रम दिवाण, सौरभ दुराफे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल कापशीकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृष्णा वैद्य, रमाकांत जोग, प्रसाद सराफ, चैतन्य कुलकर्णी, मंजिरी सहस्त्रबुद्धे, अश्विनी मेहरूणकर, सुभाष फाटक, स्मिता येवलेकर, निनाद चिखलीकर, अतुल रेणावीकर, केदार भातलवंडे आदींनी परिश्रम घेतले.
—––——————————————————
जाहिरात