गोल्डन आय न्यूज नेटवर्क
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे उद्धव कानडे स्मृती पुरस्कार !!
पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे प्रसिद्ध कवी, निवेदक उद्धव कानडे यांच्या स्मृती चिरंतन रहाव्यात या निस्सीम भावनेने निवेदन क्षेत्रातील एका ज्येष्ठ व्यक्तीस तसेच दोन उदयोन्मुख निवेदकांचा पुरस्कार देऊन गौरव केला जाणार असल्याची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी आज निवेदनाद्वारे केली.
येत्या मार्च महिन्यात पुरस्कार वितरणाचा पहिला कार्यक्रम आयोजित केला जाणार असून एका वर्षात तीन निवेदकांचा गौरव केला जाणार आहे. उद्धव कानडे हे प्रथितयश कवी होते त्याच प्रमाणे उत्तम निवेदकही होते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह म्हणून त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. कानडे यांच्या स्मृती चिरंतन रहाव्यात या उद्देशाने त्यांच्या नावे निवेदकांचा गौरव केला जाणार असल्याचे ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.
जाहिरात