ह्या वर्षीचा मानाचा सुवर्णरत्न पुरस्कार सोहळा दि 27 मे रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे विविध मान्यवर , कलाकार व मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला.
सुवर्णरत्न पुरस्काराचे संचालक सागर पौलस्ते व इतर संचालक समीर पौलस्ते , जयवंत पौलस्ते , छाया पौलस्ते , सोनाली पौलस्ते , सोनल पवार पौलस्ते व विकास घोडके यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता मांडके यांनी केले.
ह्या वर्षीचा सुवर्णरत्न पुरस्कार विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करत असलेल्या 11 रत्नांना देण्यात आला.
पुरस्कार सोहळ्यात विविध कार्यक्रमाचे सादरीकरण व पुरस्कार वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली.
मान्यवरांमध्ये प्रकाश जावडेकर , परागकाका गाडगीळ , नंदकिशोर कपोते , आनंद माडगूळकर , आनंद भाटे , अनिल नाशिककर , यशवंत वानखेडकर , हेमंत जाधव , नंदकुमार वडनेरे , जयवंत पौलस्ते व सागर पौलस्ते उपस्थित होते.
पुरस्कारार्थी व पुरस्कार खालील प्रमाणे –
मकरंद देशपांडे – जीवन गौरव पुरस्कार –
सुप्रसिद्ध अभिनेते , लेखक व दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांना 2025 चा सुवर्णरत्न पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व सुवर्णरत्न चे संचालक सागर पौलस्ते ह्यांच्या हस्ते देण्यात आला.
गश्मीर महाजनी – सर्वोत्कृष्ट अभिनेता –
प्रसिद्ध अभिनेते व निर्माते गश्मीर महाजनी यांना 2025 चा सुवर्णरत्न पुरस्कार माजी केंदीय मंत्री प्रकाश जावडेकर व प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक नंदकिशोर कपोते यांच्या हस्ते देण्यात आला.
शिव ठाकरे – स्टाईल आयकॉन –
बिग बॉस मराठीचे विजेते प्रसिद्ध अभिनेते व फॅशन आयकॉन शिव ठाकरे यांना 2025 चा सुवर्णरत्न पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे व सुवर्णरत्न चे संचालक सागर पौलस्ते यांच्या हस्ते देण्यात आला.
समिधा गुरू – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री –
प्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका समिधा गुरू यांना 2025 चा सुवर्णरत्न पुरस्कार प्रसिध्द नृत्य दिग्दर्शक नंदकिशोर कपोते यांच्या हस्ते देण्यात आला.
केतकी माटेगावकर – सर्वोत्कृष्ट गायिका –
प्रसिद्ध गायिका व अभिनेत्री केतकी माटेगावकर यांना 2025 चा सुवर्णरत्न पुरस्कार प्रसिद्ध शास्त्रीय गायक आनंद भाटे व पीनजी चे संचालक पराग गाडगीळ यांच्या हस्ते देण्यात आला.
अशोक अष्टेकर – सर्वोत्कृष्ट सुवर्णपेढी –
वामन निंबाजी अष्टेकर चे संचालक अशोक अष्टेकर यांना 2025 चा सुवर्णरत्न पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते देण्यात आला.
संदीप सोनार – सर्वोकृष्ट व्यावसायिक –
नाशिक येथील व सध्या संपूर्ण भारतभर आपला केटरिंग चा बिझनेस करणारे SR Caterers चे संचालक संदीप सोनार यांना 2025 चा सुवर्णरत्न पुरस्कार पिनजी चे संचालक पराग गाडगीळ व आम्ही पुणेकर चे हेमंत जाधव यांच्या हस्ते देण्यात आला.
वलय मूळगुंद – सर्वोकृष्ट लेखक –
अनेक मालिका , सिनेमा व गाणी लेखक वलय मूळगुंद यांना 2025 चा सुवर्णरत्न पुरस्कार जेष्ठ कवी आनंद माडगूळकर व प्रसिद्ध कवी जगदीश देवपूरकर यांच्या हस्ते देण्यात आला.
सुयश जाधव – प्रेरणादायी खेळाडू –
अर्जुन पुरस्कार विजेते सुयश जाधव यांना 2025 चा सुवर्णरत्न पुरस्कार भारत सरकार चे नेहरू युवा केंद्राचे डेप्युटी डायरेक्टर यशवंत वानखेडकर व नाशिककर ज्वेलर्स चे संचालक अजय नाशिककर यांच्या हस्ते देण्यात आला.
सुरज खटावकर – सोशल मीडिया इन्फ्लुएंसर –
सध्याच्या सोशल मीडिया च्या काळातील प्रभावी व्यक्तिमत्व सुरज खटावकर यांना 2025 चा सुवर्णरत्न पुरस्कार पीनजी चे संचालक पराग गाडगीळ व आम्ही पुणेकर चे हेमंत जाधव यांच्या हस्ते देण्यात आला.
वनिता बोराडे – स्त्री शक्ती पुरस्कार –
सर्प मित्र वनिता बोराडे यांना 2025 चा सुवर्णरत्न पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे व सामाजिक कार्यकर्ते जयवंत पौलस्ते यांच्या हस्ते देण्यात आला.
सुवर्णरत्न चे संचालक सागर पौलस्ते यांनी सर्वांचे आभार मानले.